NCCF Mumbai Bharti 2025: नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत एकूण 37 जागांची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NCCF Mumbai Bharti 2025: NCCF Mumbai Recruitment 2025 नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत “उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, शाखा लेखापाल, हिंदी अधिकारी” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरायच्या आहे. या सर्व पदांसाठी उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे.

यासाठी ऑनलाईन (ई-मेल) तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन प्रभारी कार्यालय (कार्मिक आणि प्रशासन), मुख्य कार्यालय, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड (एनसीसीएफ), एनसीयूआय कॉम्प्लेक्स, ३, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016 या पत्त्यावर अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी admincell@nccf-india.com या ई-मेल आयडीवर अर्ज करावा. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी व लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

NCCF Mumbai Recruitment 2025

National Cooperative Consumers Federation of India Limited Mumbai has announced the recruitment of “Deputy Manager, Assistant Manager, Branch Accountant, Hindi Officer” posts. A total of 37 vacancies are to be filled for these posts. Candidates must have experience for all these posts.

For this, you have to apply online (e-mail) as well as offline. Offline application should be made to the Office in Charge (Personnel and Administration), Head Office, National Cooperative Consumers Federation Limited (NCCF), NCUI Complex, 3, Siri Institutional Area, August Kranti Marg, Hauz Khas, New Delhi-110016. To apply online, apply to the email ID admincell@nccf-india.com. After checking the applications received, eligible candidates will be called for interview and written test. All the information in the application should be correct and accurate.

The last date for applying is 30 June 2025. Applications will not be accepted after the last date. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

NCCF Mumbai Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, शाखा लेखापाल, हिंदी अधिकारी
  • एकूण जागा – 37 जागा
पदाचे नावपद संख्या
उपव्यवस्थापक02
सहाय्यक व्यवस्थापक17
शाखा लेखापाल17
हिंदी अधिकारी01

NCCF Mumbai Bharti 2025: उद्दिष्टे

  • सहकारी संस्था व इतर वितरण संस्थांना परवडणाऱ्या दरात ग्राहक वस्तू पुरवण्यासाठी आवश्यक पुरवठा समर्थन देणे.
  • तसेच त्यांना तांत्रिक मार्गदर्शन व मदत पुरवणे.
  • सहकारी संस्थांसाठी वस्तूंचा पुरवठा करणे.
  • ग्राहक हित जपणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करणे.
  • ग्राहक सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे.
  • सहकारी चळवळीच्या व्यापक प्रचारासाठी प्रयत्न करणे.

NCCF Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपव्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक.
सहाय्यक व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, संगणकाचे ज्ञान आवश्यक.
शाखा लेखापालवाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी
हिंदी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय असणे आवश्यक

NCCF Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा

  • 50 वर्षे

NCCF Mumbai Bharti 2025: अनुभव

पदाचे नावआवश्यक अनुभव
उपव्यवस्थापकसंबंधित क्षेत्रातील 5 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक
सहाय्यक व्यवस्थापकसंबंधित क्षेत्रातील 3 वर्षांपर्यंतचा अनुभव आवश्यक.
शाखा लेखापाल2–3 वर्षांचा लेखा विभागातील अनुभव आवश्यक. Tally, GST, बँक सुलह, आणि आर्थिक विवरण तयार करण्याचा अनुभव असावा.
हिंदी अधिकारीअनुवादक/राजभाषा अधिकारी म्हणून 2 वर्षांचा अनुभव

NCCF Mumbai Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
उपव्यवस्थापकदरमहा रु. 56,100 – रु. 1,77,500 (Level-10)
सहाय्यक व्यवस्थापकदरमहा रु. 47,600 – रु. 1,51,100 (Level-8)
शाखा लेखापालदरमहा रु. 44,900 –रु. 1,42,400 (Level-7)
हिंदी अधिकारीदरमहा रु. 44,900 – रु. 1,42,400 (Level-7)

NCCF Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी admincell@nccf-india.com या ई-मेल आयडीवर अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

NCCF Mumbai Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • प्रभारी कार्यालय (कार्मिक आणि प्रशासन), मुख्य कार्यालय, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड (एनसीसीएफ), एनसीयूआय कॉम्प्लेक्स, ३, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016.

NCCF Mumbai Bharti 2025 : आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • जन्मतारखेचा पुरावा
  • NOC प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बायोडाटा (CV)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)

NCCF Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया

आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल.
काही पदांसाठी मुलाखत होईल तर काही पदांसाठी लेखी परीक्षा + लेखी चाचणी घेतली जाईल.
अंतिम निवड होण्याआधी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सादर करून पडताळणी पूर्ण करावी लागेल.

NCCF Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 28 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2025

NCCF Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Raman Science Center Nagpur Bharti 2025, रमन सायन्स सेंटर नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ३६,९१८ /-

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now