Eastern Railway Bharti 2024 पूर्व रेल्वेने 2024 साठी 3115 शिकाऊ पदांच्या भरतीची मोठी घोषणा केली आहे! तुम्हाला रेल्वेत करिअर करायचंय असेल आणि सरकारी नौकरी हवी असेलतर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. चला तर मग, संपूर्ण माहिती पाहूया.
Eastern Railway Bharti 2024 महत्वाच्या तारखा:
- भरती जाहीर होण्याची तारीख: 9 सप्टेंबर 2024
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 24 सप्टेंबर 2024 सकाळी 11:00 वाजता
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2024 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
उमेदवाराने या तारखांमध्येच अर्ज करायचे आहेत आणि ह्या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील, पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध लिंकवर जाऊन अर्ज भरावा लागेल.त्यामुळे वेळेत अर्ज करा!
पूर्व रेल्वे 2024 भरती साठी शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी 10 वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
संबंधित ट्रेडमधील ITI आवश्यक आहे.
Eastern Railway Bharti 2024 वयोमर्यादा:
- अर्जदाराचे वय 24 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
- SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PwBD साठी 10 वर्षे वयोमर्यादेत सवलत आहे.

Eastern Railway Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया:
पूर्व रेल्वेच्या वेबसाईटवर (www.rrcer.org) जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे, सगळी माहिती उमेदवाराने काळजीपूर्वक भरावी. वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती तपासल्यानंतरच सबमिट करावा.
Eastern Railway Bharti 2024 कोण कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकतात?
पूर्व रेल्वेच्या या भरतीमध्ये विविध ट्रेडमध्ये शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये फिटर, वेल्डर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशीनिस्ट, कारपेंटर, पेंटर, वायरमन इत्यादी ट्रेडसाठी भरती केली जाणार आहे. प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळ्या विभागांत शिकाऊ पदांची संख्या दिलेली आहे.
उदाहरणार्थ, हावडा विभागात फिटरसाठी 281, वेल्डरसाठी 61, आणि इलेक्ट्रिशियनसाठी 220 पदे आहेत. लिलुआ वर्कशॉपमध्ये फिटरसाठी 240, मशीनिस्टसाठी 33, आणि वेल्डरसाठी 204 पदे आहेत

Eastern Railway Bharti 2024 शिकाऊ पदांची एकूण संख्या :
विभाग | शिकाऊ ट्रेड | UR | EWS | SC | ST | OBC | एकूण |
---|---|---|---|---|---|---|---|
हावडा डिव्हिजन | फिटर | 114 | 28 | 42 | 21 | 76 | 281 |
वेल्डर (G&E) | 25 | 6 | 9 | 5 | 16 | 61 | |
मेकॅनिक (MV) | 4 | 1 | 1 | 1 | 2 | 9 | |
लिलुआ वर्कशॉप | फिटर | 97 | 24 | 36 | 18 | 65 | 240 |
मशीनिस्ट | 13 | 3 | 5 | 3 | 9 | 33 | |
सियालदह डिव्हिजन | इलेक्ट्रीशियन | 25 | 6 | 9 | 4 | 16 | 60 |
वायरमन | 13 | 3 | 4 | 2 | 8 | 30 |
विभागानुसार, प्रत्येक ट्रेडमध्ये रिक्त पदांची संख्या भिन्न आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असलेल्या ट्रेड साठी अर्ज करावा.

नवनवीन update साठी :: Click Here
Eastern Railway Bharti 2024 अर्ज शुल्क आणि अर्ज प्रक्रिया:
- अर्ज शुल्क: सर्वसाधारण वर्गासाठी ₹100/- शुल्क आहे. मात्र, SC, ST, PwBD, आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क नाही.
- अर्ज प्रक्रिया: उमेदवारांनी पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि योग्य फॉर्मॅटमध्ये भरावीत.
- उमेदवाराने इथे खाली जोडलेली जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी
आयुध निर्माण कारखाना देहू रोड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; पहा काय आहे पात्रता
Eastern Railway Bharti 2024 निवड प्रक्रिया:
- निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल. उमेदवारांची निवड 10 वी आणि आयटीआय परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे केली जाईल.
- जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील, जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
- यादीत पात्र उमेदवारांची संख्या अर्ज केलेल्या ट्रेडमध्ये उपलब्ध पदांच्या 1.5 पट असेल, त्यामुळे पात्रता निश्चिती आणि कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावले जाईल.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Eastern Railway Bharti 2024 महत्वाच्या अटी व शर्ते:
- हे शिकाऊ प्रशिक्षण असून, नोकरीची हमी नाही.
- शारीरिक क्षमतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर काही प्रमाणात रेल्वे नोकरीत संधी मिळू शकते.
पूर्व रेल्वेची ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज करावा. जर काही अडचणी आल्या तर वेबसाइटवरील हेल्पडेस्कची मदत घ्या.
FAQ :
Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
15 ते 24 वर्षे
Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑनलाइन
Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
23 ऑक्टोबर 2024
Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उमेदवार 10 वी उत्तीर्ण, आयटीआय