GMC Baramati Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय बारामती यांच्यामार्फत प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाची भरती सुरु झालेली आहे. ही भरती एकूण १३ पदांसाठी होत आहे ,ज्यामधील ६ रिक्त पदे प्राध्यापक पदासाठी आहेत तर ७ रिक्त पदे सहयोगी प्राध्यापक पदासाठी आहेत . या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७/११/२०२४ आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे प्रत्यक्ष कार्यालयात सादर करायची आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावे . या भरतीची सगळी माहिती खाली दिलेली आहे .
GMC Baramati Bharti 2024 भरतीचे नाव:
सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, बारामती
GMC Baramati Bharti 2024 पदाचे नाव:
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
GMC Baramati Bharti 2024 एकूण पदसंख्या:
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक मिळून एकूण 13 पदांसाठी ही भरती होणार आहे.
पदाचे नाव | पदसंख्या |
प्राध्यापक | 6 |
सहयोगी प्राध्यापक | 7 |

GMC Baramati Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
GMC Baramati Bharti 2024 वयोमर्यादा:
६९ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
GMC Baramati Bharti 2024 नोकरीचे ठिकाण:
बारामती, पुणे
GMC Baramati Bharti 2024 वेतन:
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी मासिक वेतन खालीलप्रमाणे असेल.
- प्राध्यापकांसाठी: रु. २,००,०००/- प्रति महिना
- सहयोगी प्राध्यापकांसाठी: रु. १,८५,०००/- प्रति महिना
GMC Baramati Bharti 2024 अंतिम तारीख:
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७/११/२०२४ आहे .
नवनवीन update साठी :: Click Here
GMC Baramati Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.
प्राध्यापक
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अर्हता |
---|---|---|
बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics) | 1 | M.D. (Paediatrics) / DNB (Paediatrics) |
क्षयरोगशास्त्र (Pulmonary Medicine) | 1 | M.D. (Pulmonary Medicine) / DNB (Pulmonary Medicine) |
मनोविकृतीशास्त्र (Psychiatry) | 1 | M.D. (Psychiatry) / M.D. (Psychological Medicine) / M.D. Medicine with Diploma in Psychological Medicine / DNB (Psychiatry) |
औषधवैद्यकशास्त्र (General Medicine) | 1 | M.D. (General Medicine) / DNB (General Medicine) |
कान-नाक व घसाशाख (Oto-Rhino-Laryngology) | 1 | M.S. (Oto-Rhino-Laryngology) |
अस्थिव्यंगोपचारशाख (Orthopedics) | 1 | M.S. (Orthopedics) / DNB (Orthopedics) |
सहयोगी प्राध्यापक
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अर्हता |
---|---|---|
बधिरीकरणशास्त्र (Anesthesiology) | 1 | M.D. (Anesthesiology) / DNB (Anesthesiology) |
क्ष किरणशास्त्र (Radiology) | 1 | M.D. (Radio-diagnosis) / M.D. (Radiology) / DNB (Radiology) |
बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics) | 1 | M.D. (Paediatrics) / DNB (Paediatrics) |
मनोविकृतीशास्त्र (Psychiatry) | 1 | M.D. (Psychiatry) / M.D. (Psychological Medicine) / M.D. (Medicine with Diploma in Psychological Medicine) / DNB (Psychiatry) |
औषधवैद्यकशास्त्र (General Medicine) | 1 | M.D. (General Medicine) / DNB (General Medicine) |
अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics) | 1 | M.S. (Orthopedics) / DNB (Orthopedics) |
त्वचा व गुप्तरोग (Dermatology) | 1 | M.D. (Dermatology and Venereology) / M.D. (Dermatology, Venereology and Leprosy) / M.D. (Medicine with D.V.D or D.D.) / DNB (Dermatology) |
GMC Baramati Bharti 2024 अनुभव:
पदाचे नाव | अनुभव/अर्हता/पात्रता |
प्राध्यापक | 1) वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत संबंधित विषयाचा ३ वर्षांचा सह-प्राध्यापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे. 2) किमान चार संशोधन लेख (किमान दोन लेख Associate Professor म्हणून) Medline, PubMed Central, Expanded Embase, Scopus, Directory of Open Access Journals मध्ये प्रकाशित असावेत आणि लेखक पहिल्या तीन मध्ये किंवा मुख्य लेखक असावा. 3) NMC नामांकित संस्थांमधून biomedical research चा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. 4)MET चा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. |
सहयोगी प्राध्यापक | 1) वैद्यकीय महाविद्यालय किंवा संस्थेमध्ये संबंधित विषयात ४ वर्षांचा सहायक प्राध्यापक म्हणून अनुभव असणे आवश्यक आहे. 2)किमान दोन संशोधन लेख असणे गरजेचे आहेत. हे लेख Medline, PubMed Central, Citation Index, Expanded Embase, Scopus किंवा Directory of Open Access Journals (DoAJ) मध्ये प्रकाशित असावेत. लेखक पहिल्या तीन पैकी एक किंवा मुख्य लेखक असणे आवश्यक आहे. 3)NMC द्वारा नियुक्त संस्थेतून बायोमेडिकल रिसर्चचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 4)MET चा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. |
IDBI Bank Recruitment 2024, IDBI बँक मध्ये ६०० पदांची भरती
GMC Baramati Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स:
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |