TMB Bharti 2024 :: TMB Senior Customer Service Executive Recruitment 2024 तमिळनाडू मर्कंटाईल बँक (TMB) यांनी वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (SCSE) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी एकूण 170 रिक्त जागा आहेत. 14 डिसेंबर 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी जरुर Apply करावे.
TMB Bharti 2024 इतर माहिती
पदाचे नाव – वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी (SCSE)
एकूण जागा – 170
SCSE संवर्गातील राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार रिक्त पदे व प्रादेशिक भाषा
राज्य / केंद्रशासित प्रदेश | रिक्त पदांची संख्या | प्रादेशिक भाषा |
---|---|---|
आंध्र प्रदेश | 24 | तेलुगू |
आसाम | 1 | आसामी |
छत्तीसगड | 1 | हिंदी |
गुजरात | 34 | गुजराती |
हरियाणा | 2 | हिंदी |
कर्नाटक | 32 | कन्नड |
केरळ | 5 | मल्याळम |
मध्य प्रदेश | 2 | हिंदी |
महाराष्ट्र | 38 | मराठी |
राजस्थान | 2 | राजस्थानी |
तेलंगणा | 20 | तेलुगू |
उत्तराखंड | 1 | हिंदी |
पश्चिम बंगाल | 2 | बंगाली |
अंदमान आणि निकोबार | 1 | हिंदी |
दादरा नगर हवेली | 1 | हिंदी / भिलोडी |
दिल्ली | 4 | हिंदी |
एकूण | 170 | – |
- संबंधित राज्यासाठी प्रादेशिक भाषा अनिवार्य आहे.
(ज्या राज्यासाठी उमेदवाराने अर्ज केला आहे, त्या राज्याची प्रादेशिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.) - अर्ज केलेल्या संबंधित राज्याशी संबंधित स्वतःचे निवासस्थान किंवा मूळ पत्ता दर्शवणारा पत्त्याचा पुरावा अनिवार्य आहे.
नवनवीन update साठी :: Click Here
TMB Bharti 2024 वयोमर्यादा
२६ वर्षे (त्यापेक्षा नाही )
TMB Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी (Post Graduate)
एकूण किमान 60% गुणांसह.
TMB Bharti 2024 अनुभव
आवश्यकता नाही.
TMB Bharti 2024 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत

TMB Bharti 2024 अर्ज शुल्क
- रु 1000/- (अर्ज शुल्क + माहिती शुल्क)
(डेबिट कार्ड (RuPay/Visa/MasterCard/Maestro),क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स / मोबाइल वॉलेट्स, UPI या कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करू शकता.)
TMB Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी www.tmbnet.in/tmb_careers/” या वेबसाईटवर जावे आणि “Senior Customer Service Executive (SCSE)” भरतीखालील “APPLY ONLINE” या पर्यायावर क्लिक करावे.
- अर्ज नोंदणीसाठी “Click here for New Registration” या टॅबची निवड करा आणि नाव, संपर्क तपशील, व ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल व स्क्रीनवर दर्शवला जाईल. उमेदवाराने हा नोंदणी क्रमांक व पासवर्ड लक्षात ठेवावा. तसेच ईमेल आणि एसएमएसद्वारेही नोंदणी क्रमांक व पासवर्ड पाठवले जातील.
- ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील उमेदवारांनी स्वत: काळजीपूर्वक बघावेत. कारण “COMPLETE REGISTRATION” बटण क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
- उमेदवाराचे नाव किंवा त्याच्या/तिच्या वडिलांचे/पतीचे नाव प्रमाणपत्रे, गुणपत्रिका किंवा ओळखपत्रांमध्ये जसे आहे तसेच योग्य प्रकारे भरावे. कोणतीही चूक किंवा बदल आढळल्यास अर्ज अवैध ठरवला जाऊ शकतो.
- उमेदवाराने फोटो व सही अपलोड करायची आहे.
- ‘Payment’ टॅबवर क्लिक करा व शुल्क भरण्यास पुढे जा.
- ‘Submit’ बटणावर क्लिक करून अर्ज भरायचा आहे.
TMB Bharti 2024 महत्त्वाच्या तारीख
ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्यास सुरुवात – 06 नोव्हेंबर 2024
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2024
ऑनलाइन परीक्षेची तारीख – जाहीर नाही
TMB Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
मूळपीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
Online अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |