TIDC Jalgaon Bharti 2025: Tapi Irrigation Development Corporation Jalgaon Bharti 2025 तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव भरती 2025 अंतर्गत कायदे विषयक विधी सल्लागार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्हांकरिता एकत्रितपणे सर्व प्रकारची न्यायालयीन कामकाजाकरिता अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश हवे आहेत.
ही भरती 11 महिन्याच्या करारावर होणार आहे. महामंडळाच्या मुख्यालयामध्ये पूर्णवेळासाठी विधी सल्लागार हवा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
TIDC Jalgaon Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – विधी सल्लागार
एकूण संख्या – 01 जागा
संवर्ग | कामाचा तपशील |
---|---|
अनुभवी सेवानिवृत्त न्यायाधीश विधी सल्लागार ( 01 पद) | भूसंपादन, आस्थापना, कंत्राटविषयक व इतर विविध प्रकरणी दिवाणी / जिल्हा / औद्योगिक / कामगार / उच्च / मॅट / सर्वोच्च न्यायालय येथे सुरू असलेल्या याचिका व उपरोक्त कामांसाठी कायदे विषयक सल्ला देण्यासाठी विधी सल्लागार आवश्यक आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, व नाशिक जिल्ह्याच्या एकत्रित न्यायालयीन कामांसाठी आवश्यक. |
TIDC Jalgaon Bharti 2025: वयोमर्यादा
70 वर्षांपेक्षा कमी

TIDC Jalgaon Bharti 2025: अनुभव
न्यायाधीश या पदावरील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
TIDC Jalgaon Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
जळगाव, धुळे, नंदुरबार, व नाशिक (आवश्यकतेनुसार जिल्हानिहाय न्यायालयातील काम)
TIDC Jalgaon Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अर्ज पाठवायचा आहे.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जाच्या पाकिटावर “सेवानिवृत्त अनुभवी न्यायाधीश यांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याबाबत” असे स्पष्ट लिहून अर्ज करावा.
- रु. १००/- स्टॅम्प पेपरवर उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- तसेच, अर्जासोबत आपले नाव व संपूर्ण पत्ता असलेले दोन रिकामे लिफाफे, ज्यावर रु. ३०/- इतकी रकमेची पोस्टाची तिकिटे चिकटवलेली हवीत.
- अर्जामध्ये चालू असणारा ईमेल आयडी व मोबाईल नंबर द्यावा, जेणेकरून पुढील माहिती मिळेल.
TIDC Jalgaon Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता
अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव
नवनवीन update साठी :: Click Here
TIDC Jalgaon Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड)
- अनुभव प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- रु. १००/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
- Conflict of Interest (कोणत्याही अशा कामात सहभागी होता कामा नये, ज्यामुळे सोपवलेल्या कामात व्यत्यय निर्माण होईल. यासाठी जाहीर करणे गरजेचे आहे.)
- शारीरिक व मानसिक आरोग्य ठीक असल्याचे जिल्हा सर्जनचे प्रमाणपत्र
- उमेदवाराचा न्यायालयात कोणताही खटला चालू किंवा प्रलंबित नसल्याचे संबंधित कार्यालयातून प्रमाणपत्र
- रंगीत फोटो
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसल्यास अर्ज अपूर्ण समजून अपात्र केला जाईल.
TIDC Jalgaon Bharti 2025: निवड प्रक्रिया
- निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- दिलेल्या ईमेल आयडी व मोबाईल नंबर वरून मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
- नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवाराने 15 दिवसात रुजू व्हायचे आहे.
TIDC Jalgaon Bharti 2025: इतर माहिती
- ही भरती 11 महिन्यांसाठी करार तत्त्वावर होणार आहे. तरीही कालावधी संपल्यानंतर आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने व उमेदवाराच्या संमतीने निर्णय घेऊ शकतात.
- नियुक्त झाल्यानंतर उमेदवारांस मिळालेल्या माहिती, कागदपत्रांनबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे.
- उमेदवारांशी सोपविलेले काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास कोणतीही सबब ऐकून न घेता सेवेतुन काढण्यात येईल.
- कामावर असताना नियुक्त झालेल्या उमेदवारास नैसर्गिक अपघात किंवा काही इजा झाल्यास शासन/ कार्यालय जबाबदार राहणार नाही
- आवश्यकतेनुसार प्रवास करावा लागल्यास त्यांच्या निवृत्तीच्या वेतनमानानुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता दिला जाईल.
- नियुक्त्त झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय व वित्तीय अधिकार नाही.

TIDC Jalgaon Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 24 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025
TIDC Jalgaon Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |