PM Kisan Samman Nidhi Yojana: लहान व अल्पभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य्य मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) सुरु झाली होती. ही योजना केंद्र सरकारने सुरु केली होती. महाराष्ट्रात ही योजना 2018 पासून सुरु झाली. पहिल्यांदा 2 हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुंटुबाला प्रति हप्ता 2000 म्हणजेच वर्षाला 6000 रुपये आर्थिक साहाय्य मिळेल असे होते. पण नंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केली त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. वर्षात 3 वेळा 2000 रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होईल.
The Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana (PM-KISAN) was launched to provide financial assistance to small and marginal farmers. This scheme was initiated by the Central Government and was implemented in Maharashtra from 2018.
Initially, the scheme provided financial aid of ₹2,000 per installment, i.e., ₹6,000 annually, to families owning up to 2 hectares of agricultural land. Later, the scheme was extended universally to benefit all farmers. Under this scheme, three installments of ₹2,000 each are directly deposited into the bank accounts of farmers annually.
PM Kisan Samman Nidhi Yojana: उद्दिष्ट
लहान व अल्पभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर मिळावे व शेती कामातील खर्चासाठी मदत व्हावी.
PM Kisan Samman Nidhi Yojana: पात्रता व अटी
- शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक
- जमिनीचे कागदपत्र असणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्यासोबत लिंक असावे.
- सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
PM Kisan Samman Nidhi Yojana: अपात्र लाभार्थी (योजनेस पात्र नसणारे)
- आजी /माजी खासदार, आमदार व सर्व मंत्री
- सरकारी नोकरी करणारे
- निवृत्ती वेतन १०००० पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती
- टॅक्स भरणारी व्यक्ती
- संवैधानिक पद असणारी व्यक्ती
नवनवीन update साठी :: Click Here
PM Kisan Samman Nidhi Yojana: आर्थिक सहाय्य
- पात्र शेतकऱ्यांना वर्षात 3 हप्त्यांमध्ये या योजनेचे पैसे थेट बँकेत जमा होतील.
- प्रत्येक हप्त्यांमध्ये 2,000 रुपये एवढी रक्कम असेल.
- लाभार्थी शेतकऱ्याला वर्षात 6,000 रुपये मिळतील.
PM Kisan Samman Nidhi Yojana: योजनेचे फायदे
- शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळून शेतीसाठी खर्चाची सोय होते.
- योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या थेट बँकेत जमा होतात त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव नाही.
- शेतीसाठी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास मदत होते.
- शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण कमी होते.
PM Kisan Samman Nidhi Yojana: आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- बँक खाते (आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक)
- शेतजमिनीचा सातबारा उतारा
pm kisan samman nidhi yojana : Registration
- अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या CSC सेंटर किंवा महसूल विभाग कार्यालयामध्ये अर्ज करा.
- लाभार्थ्याने अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.
- अधिकृत वेबसाइटवर शेतकरी कॉर्नर हा ऑप्शन दिसेल. इथे क्लिक केल्यावर पुढील तीन ऑप्शन दिसतील.
- त्यातील नवीन शेतकरी नोंदणी इथे जाऊन नवीन शेतकरी फॉर्म भरावा.
- आधार कार्ड नंबर, प्रतिमा कोड अशी सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
हेल्पलाईन नंबर | 155261 / 1800-115-526 (टोल-फ्री) |