Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना! पत्रकार बांधवाना सरकार करणार दरमहा ११ हजार रुपये आर्थिक मदत

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना .माध्यमे आणि पत्रकार हे भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जातात. राज्य शासन सामान्य माणसांसाठी ज्या योजना जाहीर करते. तेव्हा माध्यमे त्याचा प्रचार आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करतात. हे सर्व ते निरपेक्ष भावनेने करतात.

अशा वेळी याची सामाजिक आणि आर्थिक हेळसांड होऊ नये आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत जेष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000/- रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचे ठरवले.

पत्रकारांना पेन्शन मिळावी अशी मागणी, विविध पत्रकार संघटना, विधानमंडळ यांच्याकडून शासनाला वारंवार करण्यात येत होती. या योजनेअंतर्गत ४ वर्षांमध्ये 35 कोटी इतकी रक्कम मुंबईतील इंडियन बँक या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव स्वरूपात गुंतविण्यात आलेली आहे.

पत्रकारांच्या आर्थिक मदतीसाठी उभारण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: उद्दिष्टे

  • जेष्ठ पत्रकारांची वृद्धावस्थेत हेळसांड होऊ नये म्हणून आर्थिक सहकार्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • वृद्धावस्थेत पत्रकारांना दैनंदिन गरज भागवण्यासाठी कोणावर अवलंबून राहू लागू नये.
  • पत्रकाराने त्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: योजनेची वैशिष्ट्ये

  • ही योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
  • सर्व पात्र ज्येष्ठ पत्रकार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेतून मिळणारी रक्कम थेट पत्रकाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे.
aacharya bal shastri jambhekar | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: पात्रता

  • ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • पत्रकारितेतील 30 वर्षाचा अनुभव असावा.

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: योजने अंतर्गत मिळणारे लाभ

  • पात्र लाभार्थ्याला दरमहा 11,000/- रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
  • वैद्यकीय विमा संरक्षण ही मिळेल.
  • राज्य सरकारकडून निवड झालेल्या या निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना एक सन्मानपत्र व शाल देण्यात येते.

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा अर्ज
  • वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला)
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • शैक्षणिक माहितीची प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचा तपशील
  • अनुभवाचा पुरावा (ज्या ज्या माध्यमात काम केले आहे तेथील आदेश)
  • माध्यमामध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा / मानधनाचा पुरावा.
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: अर्ज प्रक्रिया

  • अर्जदाराने प्रथमता योजनेचा अर्ज डाउनलोड करावा.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी / उपसंचालक (विभागीय माहिती कार्यालय) / उपसंचालक (वृत्त), मुंबई यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील महासंचालक,(माहिती व जनसंपर्क) यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अर्जाची तपासणी केली जाईल
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य भरावी. तसेच अर्जासोबत सर्व कागदपत्रांची झेरॉक्स जोडावी

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होईल.
  • अर्जदार व्यक्ती पत्रकार नसल्यास.
  • अर्जात खोटी माहिती दिल्यास.
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द होऊ शकतो.
  • अर्जदारास पत्रकारितेतील 30 वर्षाचा अनुभव नसल्यास
  • अर्जदाराने वय 60 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी अर्ज केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: कार्यालयचा पत्ता


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तळमजला, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई- 400 032

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana
Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana

Acharya Balshastri Jambhekar Patrakar Sanman Yojana: महत्त्वाच्या लिंक्स

योजनेचा अर्जइथे क्लिक करा

Vitta Vibhag Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025, वित्त विभागामध्ये लेखा व कोषागारे पदासाठी ४२ रिक्त जागा, ७ व्या वेतन आयोगानुसार घसघशीत वेतन!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment