Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना! शेतकऱ्यांना सौर पंपासाठी मिळणार 95% अनुदान.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: राज्यात अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि त्यावरच उदरनिर्वाह केला जातो. बहुतांश शेतकरी गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील असतात. त्याच्याकडे कमाईचे दुसरे साधन ही नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते. त्यामुळे शेतकरी शेतीसाठी बँक, वित्तीय सहकारी, खाजगी संस्थांकडून व्याजाने कर्ज घेतात.

शेती करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. त्यासाठी शेतकरी विहीर, बोअरवेल, नदी यामधून डिझेल पंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करतात. पण ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे लाईटची काही खात्री नसते .
शेतकरी अगोदरच कर्ज घेऊन शेती करत असतात त्यात असा पाण्या अभावी पीक नीट येत नाही. त्यामुळे कर्ज फेडले जात नाही आणि शेतकरी आत्महत्या करतात. पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. त्यात दिवसा लोडशेडिंग आणि रात्री लाईट असते त्यामुळे शेतकरी शेतांना रात्री पाणी देतात.

अशात रात्रीच्या वेळी रानटी जनावर शेतकऱ्यांवर हल्ला करू शकते. हे सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या योजनेअंर्तगत राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 95% अनुदान दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी स्वतःकडील फक्त 5% रक्कम भरायची आहे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: योजनेची उद्दिष्टे

  • शेतकऱ्यांची विजेच्या बिलापासून व डिझेल च्या खर्चापासून बचत व्हावी
  • शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, जेणेकरून ते कर्जबाजारी होणार नाहीत.
  • डिझेल पंपामुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते ते कमी होईल.
  • शेतकऱ्यांना सौर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान मिळेल.
  • वीज अनुदानापासून कृषी अनुदान वेगळे करणे.
  • शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक विकास करणे जेणे करून ते आत्मनिर्भर होतील.
  • शेतीसाठी प्रोत्साहित करणे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी महावितरण कंपनीवर टाकली आहे. त्यामुळे योजना यशस्वी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी सौरपंप घेण्यासाठी प्रोत्सहीत करण्याचे दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.
  • शेतकऱ्यांना सौर पंप खरेदीसाठी अनुदान देणे ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • अटल सौर कृषिपंप योजना या नावानेही या योजनेला ओळखले जाते.
  • अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास होणार आहे.
  • योजनेसाठी लाभार्थी निवडीचा कालावधी खूप कमी आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील असावा
  • डिझेल पंप किंवा पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
  • दुर्गम भागातील व आदिवासी शेतकरी
  • राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी
  • यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखल
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • शेतीची कागदपत्रे

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत सहज आणि सोपी आहे.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करा.
  • आवश्यकतेनुसार (3/5/7 अश्वशक्ती) सौर पंपाची निवड करा.
  • त्यानंतर भरायचा अर्ज येईल त्यात विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भर.
  • त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.
  • त्यानंतर जो अर्ज क्रमानं येईल तो जपून ठेवावा त्या नंबर वरून तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे ते तुम्हाला समजेल.
  • अशा पद्धतीने अर्ज भरला जाईल.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: योजनेचे नियम

  • या योजनेचा लाभ फक्त फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
  • पूर्वी कोणतीही सरकारी योजनेचा लाभ घेत असल्यास तो शेतकरी अपात्र असेल.
  • एका शेतासाठी एकदाच लाभ घेता येईल.
  • सौर पंप दिल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी पूर्णतः त्या शेतकऱ्याची असेल.
  • 60 मी. पेक्षा खोल विहिरींना पंप मिळणार नाही.
  • सर्वसाधारण गटासाठी 10%, SC/ST साठी 5% हिस्सा आवश्यक.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: आवश्यक माहिती

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा.
कार्यालयाचा पत्ताहॉंगकॉंग बँक बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट,
मुंबई – 400 001
संपर्क1800-212-3435
1800-233-3435

Airports Authority of India Bharti 2025, AAI मध्ये रिक्त जागासाठी भरती, १२ वी उत्तीर्ण साठी खास सांधी.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment