ई पीक पाहणी कशी करावी, पहा संपूर्ण माहिती : Pik Pahani Nondani 2024

Pik Pahani Nondani 2024 ई पीक पाहणी म्हणजे काय, ई पीक पाहणी उद्दिष्ट, ई पीक पाहणी मध्ये असलेल्या विविध सुविधा, हे पाहणी कसे करायचे आणि ॲप डाऊनलोड कसे करावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Pik Pahani Nondani 2024

शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी ठेवण्याचे काम सर्वेक्षण मोबाईल ॲप द्वारे केले जाते शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ ई पीक पाहणी प्रकल्पांमधील माहिती द्वारे देण्यात येतो पीक पाहणी केल्यामुळे खातेदारांना पीक कर्ज देणे, पिक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.

Pik Pahani Nondani 2024 पीक पाहणी चे मुख्य उद्दिष्टे :

  • पीक पेरणी अहवालाची माहिती एकत्रित करणे.
  • माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करता येऊ शकते.
  • पीक पाहणी तसेच पीक विमा निकालामध्ये काढणे.

E Pik Pahani चे फायदे :

  • गाव जिल्हा तालुका आणि विभागांमधील पिकांखालील असलेल्या क्षेत्राची आकडेवारी सहज उपलब्ध करून देता येते
  • शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ ई पीक पाहणी प्रकल्पांमधील माहितीद्वारे दिला जातो
  • खातेदारांना आणि तुषार सिंचन योजनांचा लाभ देणे शक्य होणार आहे.
  • या ॲपद्वारे कृषी गणना अत्यंत सुलभ आणि अत्यंत सोप्या पद्धतीने करता येऊ शकते.
  • खातेदारांना पीक कर्ज देणे पीक विमा भरणे तसेच पीक नुकसान भरपाई इत्यादी पीक पाहणी मुळे शक्य होणार आहे.
  • खात्यानुसार आणि पीक क्षेत्रानुसार यादी उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून देण्यात येत असलेल्या रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येऊ शकतो.(ई पीक पाहणी)

E Pik Pahani ॲप मध्ये असणाऱ्या सुविधा :

  • स्वयं प्रमाणित शेतकरी ई पीक पाहणी ला मान्यता
  • तलाठी मार्फत किमान 10% तपासणी
  • 48 तासाच्या आत ई पीक पाहणी दुरुस्ती सुविधा
  • इतर तीन मुख्य पीक मिश्र पिकांमध्ये नोंदवण्याच्या सुविधा
  • ई पीक पाहणी संपूर्ण गावाची बघण्याची सुविधा
  • ऐप बद्दल स्वतःचे मत नोंदवण्याची सुविधा
  • खाते अपडेट करण्याची सुविधा

Pik Pahani Nondani 2024 पीक पाहणी कशी करावी ?

  • आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी वर्जन दोन हे एप्लीकेशन प्ले स्टोअर च्या माध्यमातून डाऊनलोड करून घ्यावे लागते
  • आपला जिल्हा निवडा
  • आपल्या तालुका निवडावा लागेल
  • आपले गाव निवडावे लागेल
  • खातेदार किंवा गट नंबर टाका
  • आपला परिचय निवडा
  • पुन्हा होम पेज वर जा
  • पिकाबद्दल माहिती भरा आणि खाते क्रमांक निवडा
  • गट क्रमांक निवडा
  • यानंतर हंगाम निवडावा
  • पिकांचा वर्ग निवडावा
  • जमिनीचे एकूण क्षेत्र भरा
  • जर एक पीक असेल तर निर्मळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पीक असेल तर बहुतेक निवडा
  • पिकांची नावे लिहा
  • क्षेत्र भरा
  • जलसिंचनाचे साधन भरा
  • सिंचन पद्धत निवडा
  • लागवडीचे दिनांक निवडा
  • मुख्य पिकाचे चित्र अपलोड करावे चित्रा अपलोड करत असताना आपल्या मोबाईलचा जीपीएस चालू असणे आवश्यक आहे
  • यानंतर पीक पाहणी अर्ज सबमिट करा

Pik Pahani Nondani 2024 सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने तलाठी कार्यालयामध्ये न जाता मोबाईल वरून आपल्या सातबारा वरती विविध पिकांची नोंदणी करणे शक्य झाली आहे या ई पीक पाहणी अँप द्वारे मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच संपूर्ण गावाची पीक पाहणी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे .

शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे राज्याच्या सध्या वापरण्यात येत असलेल्या ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. जेव्हापासून विविध पीक पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आली आहे तेव्हापासून महाराष्ट्रामधील बरेच शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून घेतलेली आहे. यामध्ये पीक पाहणी शेतकऱ्यांना डाउनलोड करायचे आहे आणि त्यावर ती शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी करायची आहे.

शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर यासाठी सर्वप्रथम जिल्हा निवडावा लागतो आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये जाऊन तालुका निवडावा लागतो नंतर आपले गाव निवडून खातेदार किंवा गट क्रमांक निवडून आपला परिचय टाकावा लागतो आणि पुन्हा होम पेजवर जाऊन पिकाबद्दल संपूर्ण माहिती भरणे आवश्यक असते. यानंतर हंगाम निवडावा लागतो पिकांचा वर्ग निवडून एकूण क्षेत्र भरावे लागते तसेच पिकांची नावे देखील यामध्ये आवश्यक असतात. यामध्ये वापरत असणाऱ्या सिंचन पद्धती निवडणे आवश्यक असते. मुख्य पिकांचे चित्र अपलोड करत असतानाच आपल्या मोबाईलचा जीपीएस चालू आणि त्यानंतर माहिती सबमिट करण्याआधी पुन्हा एकदा तपासून पहावे लागते. Pik Pahani Nondani 2024

ई पीक पाहणी ऐप डाऊनलोड कसे करावे ?

  • पीक पाहणी ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ॲप उघडायचा आहे
  • यामध्ये तुम्हाला ई पीक पाहणी असे सर्च करावे लागेल
  • यानंतर ई पीक पाहणी वर्जन दोन वर क्लिक करायचे आहे
  • त्यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल वरती क्लिक करायचे आहे किंवा त्याच्या समोरील लिंक वरती क्लिक करून तुम्ही ॲप डाऊनलोड करू शकता.(E Pik Pahani)

शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी(E Pik Pahani) साठी मिळालेला प्रतिसाद :

  • नऊ दशलक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी तपासणी कार्यक्रमाद्वारे आधीच त्यांच्या नोंद पिकांची नोंदणी करून घेतली आहे 7 दशलक्ष पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सातबारा नोंदणी प्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण केलेली आहे
  • मागील वर्षांमध्ये 380 पिके खरीप हंगामातील 363 पिके रब्बी हंगामातील आणि उन्हाळी हंगामातील 183 पिकांसह 1926 पिकांची नोंद करण्यात आलेली आहे
  • मागील वर्षाच्या आधारे सोयाबीनच्या लागवडीने 2.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र व्यापले असून हरभरा पिकाने सुमारे 0.99 दशलक्ष हेक्टर व्यापलेले पाहायला मिळते.
  • 191 हजार 338 हेक्टर तांदूळ लागवड क्षेत्रफळाच्या महत्वपूर्ण क्षेत्रावर ती केली गेलेली आहे जे मुख्य पीक म्हणून त्याचे महत्त्व दिसून येत आहे.
  • हे सर्व लक्षात घेण्यासाठी आकडे प्रक्रियांचे लक्षणीय प्रमाण प्रदेशांमधील पीक लागवडीचे महत्त्व दर्शवत असल्याचे पाहायला मिळत आहे. Pik Pahani Nondani 2024

लहान व्यवसायांसाठी सरकारकडून मिळणार बिनव्याजी 50,000 कर्ज

FAQ

पीक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे ?

आपल्या मोबाईलद्वारे प्ले स्टोअर ॲप च्या माध्यमातून ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून घ्यावे

पीक पाहणी अँप चे फायदे काय आहेत ?

गाव जिल्हा तालुका आणि विभागांमधील पिकांखालील असलेल्या क्षेत्राची आकडेवारी सहज उपलब्ध करून देता येते

Leave a Comment