PM Vishwakarma Yojana: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नक्की काय आहे? जाणून घ्या अधिक माहिती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Vishwakarma Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना ही भारतातील जे कारागीर किंवा कलाकार आहेत त्यांच्यासाठी ही सुरू केलेली आहे. ही एक पारंपरिक कौशल्य असणाऱ्या असंघटित कामगारांना मदत मिळावी या हेतूने हा कार्यक्रम सुरु केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत व प्रशिक्षण मिळू शकते.

पारंपरिक कौशल्याला चलन देण्यासाठी व ती कौशल्ये टिकून ठेवण्यासाठी भारत सरकारने पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. यात विविध अठरा प्रकारची हस्त कौशल्ये सामील आहे.

या योजनेद्वारे लोकांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाणार असून त्या द्वारे या क्षेत्रातील लोकांना ओळख मिळवून दिली जाऊ शकते. या योजनेअंतर्गत ३० लाख कारागिरांच्या कुटुंबांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पात्र व इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.

PM Vishwakarma Yojana: इतर माहिती

योजनेचे नावप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
योजना सुरू करणारकेंद्र सरकार
प्रतिनिधीत्व करणारे मंत्रालयइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पोर्टलpmvishwakarma.gov.in
उद्देशकारागिरांमधील हस्तकला कौशल्ये सुधारणे
याचा फायदाग्रामीण कारागीर, उपेक्षित समाजातील कारागीर आणि कामगार यांचे उन्नतीकरण
लाभार्थीमजूर, कारागीर आणि कामगार
लाभार्थी मर्यादा30 लाख कुटुंबे
अर्थसंकल्पीय रक्कम₹13,000 कोटी
हस्तांतरणाची पद्धतDBT (थेट लाभ हस्तांतरण)
पेमेंट यंत्रणाई-पेमेंट यंत्रणा
स्टायपेंड रक्कम₹500 प्रति दिन
प्रोत्साहन रक्कम₹15,000 ते ₹1,00,000
होस्टिंग साइटराष्ट्रीय माहिती केंद्र (NIC)
फॉर्म सबमिशनची अंतिम तारीखलवकरच अपडेट केली जाईल
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
Screenshot 2025 03 05 at 6.16.06 PM | Sarkari Warta-सरकारी वार्ता

PM Vishwakarma Yojana: योजनेचे उद्दिष्ट्ये

  • या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील कुशल कामगारांना सहजसोप्या पद्धतीने कमी व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.
  • पारंपरिक कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देणे आणि त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे
  • या योजनेद्वारे ३० लाख कुटुंबापर्यंत लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • या योजनेमुळे बेरोजगारी कमी होऊन रोजगाराचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात .

PM Vishwakarma Yojana: योजनेची पात्रता

  • अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • एका कुंटुबात रक्च व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • अर्जदाराच्या कुंटुबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
  • अर्जदार हा सद्यस्थितीत त्याचे पारंपरिक कौशल्यावर आधारित काम करत असावा.
  • अर्जदाराने गेल्या मागील ५ वर्षात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेतून कर्ज लाभ घेतला नसावा.
स्वयंरोजगार व्यवसायसविस्तर माहिती
सुतारलाकडी उत्पादने तयार करण्यासाठी हात आणि साधनांनी काम करतात
बोट मेकरलाकडी बोटी बनवण्यासाठी हात आणि साधनांनी काम करतात
लोखंड/धातू/दगड आधारित व्यापारतलवारी, ढाल, चाकू, हेल्मेट इत्यादी शस्त्रांची निर्मिती, दुरुस्ती किंवा सेवा करतात
लोहारलोखंड, तांबे, पितळ किंवा कांस्य यांसारख्या धातूंपासून उत्पादन तयार करतात
हातोडा आणि टूल किट मेकरहातोडे आणि साधने तयार करण्यासाठी लोखंडासारख्या धातूंचा वापर करतात
लॉकस्मिथकुलूप तयार करणे, स्थापित करणे आणि दुरुस्त करणे
सोनारसुवर्ण आभूषणांची निर्मिती करतात
कुंभारमातीच्या विविध वस्तू तयार करतात
शिल्पकारघड्याळ, मुद्रांक आणि अन्य कलाकृतींची निर्मिती करतात
शिंपीकपड्यांचे शिवणकाम करतात
वॉशरमनवॉशिंग मशीन दुरुस्ती करतात
मेसनदगड, विटांसारख्या सामग्री वापरून बांधकाम करतात
बास्केट/चटई/झाडू मेकर/कोयर विणकरबास्केट, झाडू, चटई इत्यादी वस्तूंची निर्मिती करतात
बाहुली आणि खेळणी मेकर (पारंपारिक)बाहुल्या आणि खेळण्यांची निर्मिती करतात
न्हावीकेस कापणे आणि चेहऱ्याची सुंदरता वाढवणे
हार घालणाराविविध प्रकारच्या आभूषणांची निर्मिती करतात
फिशिंग नेट मेकरमासेमारीसाठी जाळी तयार करतात

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

PM Vishwakarma Yojana: योजनेचे फायदे

  • अर्जदारांना डिजिटल ओळखपत्र आणि पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र दिले जाते.
  • अर्जदारांना आवश्यक ते सर्व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.
  • प्रशिक्षण घेतल्यानंतर दररोज ₹500 स्टायपेंड (५-७ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी) दिले जातात.
  • १५ दिवसांचे निवासी प्रशिक्षणही उपलब्ध आहे त्यामध्ये मोफत भोजन व निवास याची सोय केली जाते.
  • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ₹15,000 पर्यंत टूलकिट सहाय्यही दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय कमी व्याजदरात सहजसोप्या पद्धतीने कर्ज मिळते.
  • वस्तूंच्या ब्रँडिंग, पॅकेजिंग, डिझाइन आणि मार्केटिंग करताना मदत केली जाते.
  • ई-कॉमर्स पोर्टलवर उत्पादने सूचीबद्ध करण्याची संधी मिळते.
  • व्यापारी मेळाव्यात सहभाग आणि डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिले जाते.

PM Vishwakarma Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • व्यवसायाचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • बँक खाते माहिती (आधार लिंक असलेले)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाइल नंबर

PM Vishwakarma Yojana: अर्ज प्रक्रिया

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
  • आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरिफाय करा.
  • व्यक्तिगत व व्यवसायाची सर्व माहिती अचूक व योग्य भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा

PM Vishwakarma Yojana: महत्त्वाच्या लिंक्स

🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
📃ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

PM Vishwakarma Yojana
PM Vishwakarma Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment