SECI Bharti 2025: सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. वरिष्ठ सल्लागार पदाची एक आणि तरुण व्यावसायिक पदाच्या दोन जागा भरण्यासाठी ही भरती निघाली आहे. पण काही कारणास्तव पदसंख्या बदलू ही शकते. ही भरती 11 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
उमेदवाराची कामगिरी समाधानकारक असल्यास कामाचा कालावधी वाढू शकतो. नियुक्त केलेल्या उमेदवारांस नियमित कार्यालयीन वेळ पाळावी लागेल. गरज पडल्यास सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागेल. केवळ पात्र उमेदवारांनाच लेखी परीक्षा / गटचर्चा / मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल. एका उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल, परंतु प्रत्येकासाठी वेगळा अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यास सुरुवात 16 मार्च 2025 होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
SECI Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, Young Professional
एकूण संख्या – 03 जागा
वरिष्ठ सल्लागार | 01 जागा |
तरुण व्यावसायिक | 02 जागा |
वयोमर्यादा | 30 – 63 वर्षे |
शैक्षणिक पात्रता | Bachelor of Engineering/ B. Tech Bachelor in Engineering in Electrical / Mechanical/ Electronics |
अनुभव | आवश्यक |
वेतन | रु 70,000/- ते रु. 1,50,000/- दरमहा |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2025 |

SECI Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
वरिष्ठ सल्लागार
- ऊर्जा विनिमयांमध्ये वीज खरेदी आणि विक्रीसंदर्भात सल्ला देणे.
- विविध व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी मुक्त प्रवेश वीज पुरवठ्यासाठी नवीन व्यवसाय निर्माण करणे.
- वेगवेगळ्या बाजार विभागांमध्ये SECI साठी नवीन व्यवसाय संधी निर्माण करणे,
- व्यवसाय लक्ष्ये साध्य करणे, विविध नियामक आराखड्यांचे विश्लेषण करून त्यांची अंमलबजावणी करणे आणि वीज बाजारावर सतत नजर ठेवणे.
तरुण व्यावसायिक
- कॉर्पोरेट प्लॅनिंग ही भूमिका SECI मधील धोरणात्मक निर्णयांसाठी डेटा विश्लेषण करण्याची जबाबदारी सांभाळेल.
- विविध विभागांशी संपर्क साधून डेटा संकलन, प्रक्रिया आणि विश्लेषण करणे.
- तसेच कॉर्पोरेट नियोजन, प्रकल्प मूल्यांकन आणि संस्थात्मक वाढीसाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करणे हे मुख्य काम असेल.
SECI Bharti 2025: वयोमर्यादा
- 30 – 63 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
SECI Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ सल्लागार – Bachelor of Engineering/ B. Tech
- तरुण व्यावसायिक – Bachelor in Engineering in Electrical / Mechanical/ Electronics
SECI Bharti 2025: अनुभव
वरिष्ठ सल्लागार
- किमान 20 वर्षांचा पदवीत्तर अनुभव असावा.
- ज्यामध्ये किमान 10 वर्षांचा वीज बाजारातील प्रत्यक्ष कार्याचा अनुभव आवश्यक
Young Professional
- किमान 3 वर्षांचा पदवीत्तर अनुभव असावा.
- हा प्रतिष्ठित संस्थेत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी डेटा विश्लेषण, बाजार संशोधन आणि वीज क्षेत्रातील जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासंबंधी असावा.
SECI Bharti 2025: वेतन
- रु. 1,50,000/- दरमहा
SECI Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी रजिस्टर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी वापरलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर किमान १ वर्षे चालू ठेवावा.
- अर्जामधील माहिती चुकीची आढळ्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अपूर्ण अर्ज फेटाळले जातील; पात्रतेसंदर्भात नंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून Pdf अपलोड करावी.
- एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल, परंतु प्रत्येकासाठी वेगळा अर्ज करावा लागेल.
- शेवटच्या तारखेपूर्वी आलेले अर्जच गृहीत धरले जातील.
SECI Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- Bachelor of Engineeringचे प्रमाणपत्र
- B. Tech प्रमाणपत्र
- Bachelor in Engineering in Electrical / Mechanical/ Electronics गुणपत्रक/प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- NOC प्रमाणपत्र (आता काम करत असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र
- सॅलरी स्लिप्स (आता काम करत असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी
SECI Bharti 2025: निवड प्रक्रिया
- अर्जाची तपासणी केल्यानंतर केवळ पात्र उमेदवारांनाच लेखी परीक्षा / गटचर्चा / मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन SECI पात्रता ठरवण्याचा आणि निवड प्रक्रिया ठरवण्याचा अधिकार राखून ठेवते.
SECI Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2025
SECI Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात – 1 | इथे क्लिक करा |
📑 PDF जाहिरात – 2 | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
