MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 792 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी उमेदवारास अध्यापन क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच या पदाची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या निकषांवर उमेदवारास मुलाखतीस बोलावले जाईल. जास्त प्रमाणात अर्ज आल्यास चाचणी परीक्षा ही घेतली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाने पात्र आहे म्हणून उमेदवारास डायरेक्ट मुलाखतीस बोलावले जाईल असे नाही.
यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन तसेच ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने भरता येईल. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्ज रद्द केले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
MPSC Group B Recruitment 2025
Maharashtra Public Service Commission has announced the recruitment of Assistant Professor, Medical Education and Research Services, Group-B under Group-B. A total of 792 vacancies are to be filled for this post. For this, the candidate must have three years of experience in the field of teaching.
Also, the selection for this post will be through interview. The candidate will be called for an interview based on the criteria of educational qualification and experience. If a large number of applications are received, a test test will be conducted. The candidate will not be called for a direct interview just because he is eligible with educational qualification and experience.
The application for this has to be made online. The application fee can be paid both online and offline. All the necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. Applications received after the last date will be cancelled. The last date for application is 19 May 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
MPSC Group B Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब
एकूण जागा -792 जागा
पदाचे नाव | सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब |
शैक्षणिक पात्रता | मास्टर डिग्री किंवा डॉक्टरेट डिग्री. |
वयोमर्यादा | 19 वर्षे ते 38 वर्षे |
अनुभव | आवश्यक |
अर्ज प्रक्रिया | online |
निवड | मुलाखतीद्वारे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 मे 2025 |
MPSC Group B Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- वैद्यकीय विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक अध्यापन करणेआणि रुग्णालयीन प्रशिक्षण घेणे.
- शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा (OPD/IPD/आपत्कालीन सेवा) देणे.
- विभागीय प्रशासकीय कामकाजात सहभाग होऊन गरजेवेळी सल्ला देणे.
- विभागीय मीटिंग्स, निरीक्षण अहवाल तयार करणे.
- वैद्यकीय संशोधन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे
- शिस्त व व्यावसायिक नैतिकतेचे पालन करणे.

MPSC Group B Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- संबंधित विषयात मास्टर डिग्री किंवा डॉक्टरेट डिग्री.
MPSC Group B Bharti 2025: वयोमर्यादा
- 19 वर्षे ते 38 वर्षे
MPSC Group B Bharti 2025: अनुभव
- उमेदवारास अध्यापनातील तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
MPSC Group B Bharti 2025: वेतन
- दरमहा रु. 57,700/- ते रु.1,82,200/-
नवनवीन update साठी :: Click Here
MPSC Group B Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- महाराष्ट्र
MPSC Group B Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- त्यासाठी उमेदवाराचे नोंदणी प्रोफाइल नसेल तर ते तयार करावे.
- अर्ज भरताना सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन व ऑफलाईन (चलनाद्वारे) असा दोन्ही पद्धतीने भरता येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
MPSC Group B Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- एस.एस.सी. किंवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड/नोंदणी क्रमांक
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पुरावा
- खेळाडू आरक्षणासाठी पुरावा
- अधिवास प्रमाणपत्र (आरक्षणासाठी)
- एस.एस.सी. नाव बदलाचा पुरावा
- मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा (लागू असल्यास)
- राज्य शासकीय कर्मचारी वयोमर्यादा सवलतीचा पुरावा
- वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र
MPSC Group B Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य उमेदवारांसाठी – रु. 719/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी – रु. 449/-
MPSC Group B Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- उमेदवाराचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता तपासून मुलाखतीस बोलावले जाईल.
- अर्जांची संख्या जास्त असल्यास चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्याचा अभ्यासक्रम अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
- परीक्षा घेतल्यास त्याचे व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेतले जातील. पण परीक्षा न झाल्यास फक्त मुलाखतीचे गुण पाहिले जातील.
- मुलाखतीत किमान 41% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत.
- उमेदवार शैक्षणिक व अनुभवाने पात्र असला तरी थेट मुलाखतीस बोलावलं जाईलच असे नाही.
MPSC Group B Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025
MPSC Group B Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
IIPS Mumbai Bharti 2025, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती!!
