AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: AIIMS बिलासपूर हे एक सर्वोच्च आरोग्यसेवा संस्थान आहे, जे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)” अंतर्गत स्थापन केले आहे. या संस्थे अंतगर्त 110 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), बिलासपूर यांनी प्राध्यापक (ग्रुप-A) [प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहायक प्राध्यापक] पदांसाठी थेट भरती/प्रतिनियुक्ती/ कराराच्या आधारे भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे तर ऑफलाईन हार्ड कॉपी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे. हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक (प्रशासन), प्रशासकीय ब्लॉक, 3रा मजला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कोठीपुरा, बिलासपूर, हिमाचल प्रदेश – 174037 आहे. ज्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे आणि जे पात्रता निकष पूर्ण करतात, त्यांनी अधिसूचना वाचून ऑनलाईन अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: इतर माहिती
एकूण जागा – 110
पदाचे नाव | एकूण पदे | फॅकल्टी कोड |
---|---|---|
प्राध्यापक (Professor) | 22 | 001 |
अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) | 16 | 002 |
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) | 16 | 003 |
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) | 56 | 004 |
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: वयोमर्यादा
प्राध्यापक / अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे
सहयोगी प्राध्यापक / सहायक प्राध्यापक – 50 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
AIIMS, Bilaspur Faculty Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांकडे संबंधित शाखेतील पदव्युत्तर वैद्यकीय पदवी असावी, जसे की एम.डी./एम.एस./डी.एम./एम.चि./डॉक्टरेट पदवी.
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: वेतन
पदाचे नाव | एकूण वेतन (महिना) |
---|---|
प्राध्यापक (सल्लागार) | ₹ 2,20,000/- |
अतिरिक्त प्राध्यापक (सल्लागार) | ₹ 2,00,000/- |
सहयोगी प्राध्यापक (सल्लागार) | ₹ 1,88,000/- |
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: नोकरीचे ठिकाण
बिलासपूर

AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: अर्ज शुल्क
सामान्य उमेदवारांसाठी – रु. 2360/-
SC/ST साठी – रु. 1180/-
PwBD साठी शुल्क नाही.
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: अर्ज प्रक्रिया
- उमेदवाराने ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती, तसेच अर्जाचा प्रिंटआउट (परिशिष्ट-I) आणि कव्हरिंग लेटरसह खालील पत्त्यावर 22.01.2025 रोजी सायं. 05:00 वाजेपर्यंत पोहोचतील याची खात्री करावी.
पत्ता –
उपसंचालक (प्रशासन),
प्रशासकीय ब्लॉक, 3रा मजला,
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस,
कोठीपुरा, बिलासपूर,
हिमाचल प्रदेश – 174037
- अर्ज असलेल्या लिफाफ्यावर खालीलप्रमाणे उल्लेख करावा:
“AIIMS, बिलासपूर (H.P.) साठी ……………… विभागातील ……………… पदासाठी अर्ज”
- निर्धारित तारखेपर्यंत हार्ड कॉपी सादर करण्यात अपयश आल्यास, उमेदवारी रद्द केली जाईल.
AIIMS Bilaspur Faculty Bharti 2024: निवड प्रक्रिया
- निर्धारित दिनांक व वेळेत प्राप्त झालेले अर्ज आणि आवश्यक शुल्क भरलेले उमेदवारांचे अर्ज संस्थेच्या छाननी समितीकडून तपासले जातील.
- पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- फक्त पात्रतेचे निकष पूर्ण करणे (सेवेचा कालावधी, अनुभव इ.) मुलाखतीसाठी बोलावण्याचा हक्क मिळवून देत नाही. पात्रता अनुभव, संशोधन, प्रकाशने, प्रशासकीय अनुभव इत्यादींच्या आधारे ठरवली जाईल.
- अर्जदारांची संख्या जास्त असल्यास, निवड समिती अतिरिक्त निकष व प्रक्रिया ठरवू शकते, ज्यामध्ये लेखी परीक्षा देखील समाविष्ट असू शकते.
- केवळ पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम पात्रता कागदपत्र पडताळणीवर अवलंबून असेल.
- मुलाखतीची पत्रे पोस्ट/ई-मेलद्वारे पाठवली जातील आणि वेळापत्रक संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
- मुलाखतीदरम्यान उमेदवारांना त्यांच्या कामगिरी संदर्भात 5 मिनिटांची सादरीकरण MICROSOFT POWERPOINT मध्ये करावी लागेल.
- सादरीकरणाची कापी पेन ड्राईव्हमध्ये अर्जासोबत जमा करावी लागेल.
AIIMS Bilaspur Faculty (Group-A) Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्याची सुरुवात – 15 डिसेंबर 2024
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 15 जानेवारी 2025
- हार्ड कॉपी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 22 जानेवारी 2025
AIIMS Bilaspur Faculty (Group-A) Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 आँनलाईन अर्ज | ईथे क्लिक करा |
🌐अधिकृत वेबसाईट | ईथे क्लिक करा |