GMC Miraj Bharti 2025: GMC Miraj Recruitment 2025 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती २०२५ मध्ये प्राध्यापक गट-अ व सहयोगी प्राध्यापक गट-अ पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आवक विभाग आहे. ही तात्पुरती करार तत्त्वावर होणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण माहिती असलेला अर्ज किंवा कागदपत्रे नसल्यास अर्ज नाकारला जाईल. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवाराने स्व-खर्चाने उपस्थित राहायचे आहे. तसेच उमेदवाराने मुलाखतीला येताना अर्जासोबत जोडलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत.
नियुक्त झाल्यानंतर उमेदवारास किमान एक शैक्षणिक सत्र पूर्ण होईपर्यंत राजीनामा देता येणार नाही. उमेदवार भारताचा किंवा महाराष्ट्राचा नागरिक असावा. उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवाराने रुजू होण्यापूर्वी 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र देणे आवश्यक आहे. अर्ज करण्यास 07 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
The Government Medical College, Miraj-Sangli, has announced recruitment for the posts of Professor (Group A) and Associate Professor (Group A). A total of 24 vacancies will be filled through this recruitment.
Applications must be submitted in offline mode only; online applications will not be accepted. The application address is Government Medical College, Miraj, Inward Section. This recruitment is on a temporary contractual basis.
Candidates must attach photocopies of the required documents with the application form. Incomplete applications or those without the necessary documents will be rejected. The selection process will be based on interviews, and candidates must attend the interview at their own expense.
During the interview, candidates must carry all the original documents attached to their applications.
Selected candidates cannot resign until completing at least one academic session. Applicants must be citizens of India or Maharashtra and should possess the required experience for the position.
Before joining, candidates must submit an affidavit on ₹500 stamp paper. Applications will be accepted starting 07th January 2025, and the last date to apply is 18th January 2025.
Eligible and interested candidates should carefully read the official advertisement (PDF) before applying.
GMC Miraj Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 24
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
प्राध्यापक गट-अ | 04 |
सहयोगी प्राध्यापक गट-अ | 20 |

GMC Miraj Bharti 2025: वयोमर्यादा
69 वर्षांपेक्षा कमी
GMC Miraj Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
प्राध्यापक गट-अ | MD/MS/DNB |
सहयोगी प्राध्यापक गट-अ | MD/MS/DNB |
GMC Miraj Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे.
GMC Miraj Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
मिरज, सांगली
नवनवीन update साठी :: Click Here
GMC Miraj Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
प्राध्यापक गट-अ | Rs. 1,85,000/- |
सहयोगी प्राध्यापक गट-अ | Rs. 1,70,000/- |
GMC Miraj Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- दिलेल्या पत्त्यावर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी सुद्धा जोडायची आहे.
- अपूर्ण अर्ज अपात्र ठरवला जाणार आहे.
- दिलेल्या पत्त्यावर अर्ज वेळेत पोहचेल याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.
- अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची मूळ कॉपी मुलाखतीवेळी घेऊन येणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
GMC Miraj Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ कलर फोटो
- 10 वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
- 12 वी प्रमाणपत्र आणि मार्कशीट
- MBBS, MD/MS/DNB सर्व मार्कशीट
- MBBS, MD/MS/DNB डिग्री प्रमाणपत्र
- इतर संबंधित विषयातील अतिरिक्त पात्रता (DNB/CPS/PhD/फेलोशिप)
- अनुभव प्रमाणपत्र
- संशोधनावर प्रकाशित लेख
- वय, राष्ट्रीयत्व, निवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र
- बायोमेडिकल रिसर्च मध्ये बेसिक कोर्स प्रमाणपत्र
- बेसिक, रिवाइज्ड बेसिक कोर्स इन MET प्रमाणपत्र
MIDC अंधेरी मुंबई मध्ये Mechanical Engineer पदासाठी भरती,थेट मुलाखतीद्वारे निवड
GMC Miraj Bharti 2025: निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- मुलाखतीला येताना अर्जासोबत जोडलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत.
- उमेदवाराने मुलाखतीस स्व-खर्चाने उपस्थित राहावे.
- शारीरिक दृष्ट्या निरोगी असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराने देणे गरजेचे आहे.
- रुजू होण्यापूर्वी 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र देणे आवश्यक आहे.
GMC Miraj Bharti 2025: इतर महत्त्वाची माहिती
- ही भरती करार तत्त्वावर असल्यामुळे नियुक्त उमेदवारास कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार मिळणार नाहीत.
- उमेदवारास कागदपत्रे व माहितीबाबत गोपनीयता पाळणे बंधनकारक आहे.
- उमेदवारास वैयक्तिक 8 दिवसच सुट्टी मिळेल.
- उमेदवारास दिलेली सुनिश्चित कामे पार पडणे आवश्यक आहे.
- खाजगी वैद्यकीय सेवा करण्यास परवानगी आहे. परंतु प्रथमता महाविद्यालयीन व रुग्णालयीन जबाबदाऱ्या प्राधान्याने पार पाडाव्यात.
GMC Miraj Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्यास सुरुवात – 07 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जानेवारी 2025

GMC Miraj Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |