Indian Army SSC Tech Bharti 2025 : Indian Army SSC Tech Recruitment 2025 भारतीय सैन्य अंतर्गत “एसएससी तांत्रिक अधिकारी” पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 381 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवले जातील. अर्ज भरल्यानंतर ३० मिनीटांनी रोल नंबर सह प्रिंट घ्यावी. मुलाखतीला इतर कागदपात्रांसोबत ही प्रिंट ही घेऊन येणे गरजेचे आहे, याची उमेदवारांने काळजी घ्यावी.
निवड झाल्यानंतर उमेदवाराचे ४९ आठवडे प्रशिक्षण असेल. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलते पण मधूनच प्रशिक्षण सोडल्यास उमेदवारास भरपाई द्यावी लागेल. उमेदवाराने १० वर्षे सेवा करणे अपेक्षित आहे. उमेदवारास अधिकारी म्हणून कोणत्याही भागात किंवा कोणत्याही विभागात पाठवले जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षणादरम्यान विवाह करण्यास मनाई आहे. विवाह केल्यास उमेदवारांची नियुक्ती रद्द केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
The Indian Army has announced recruitment for the post of “SSC Technical Officer.” A total of 381 vacancies will be filled through this recruitment. Applications must be submitted online. Incomplete applications will be disqualified. After completing the application process, candidates must take a printout of the application with the roll number within 30 minutes. This printout must be carried along with other documents during the interview, so candidates should ensure this requirement is fulfilled.
Selected candidates will undergo 49 weeks of training. The entire cost of training will be borne by the government; however, if the candidate discontinues the training midway, they will be required to reimburse the expenses. Candidates are expected to serve for a minimum of 10 years. They may be posted as officers in any region or department. During the training period, candidates are prohibited from getting married. If a candidate gets married, their appointment will be canceled.
The last date to apply is February 5, 2025. Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before submitting their application.
Indian Army SSC Tech Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – एसएससी तांत्रिक अधिकारी
एकूण जागा – 381
Indian Army SSC Tech Bharti 2025: वयोमर्यादा
20 ते 27 वर्षापर्यंत
Indian Army SSC Tech Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
एसएससी तांत्रिक अधिकारी | B.E. / B.Tech कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पदवी आवश्यक |
Indian Army SSC Tech Bharti 2025: अनुभव
आवश्यकता नाही
नवनवीन update साठी :: Click Here
Indian Army SSC Tech Bharti 2025: वेतन
एसएससी तांत्रिक अधिकारी – दरमहा रु. 56,100/- ते रु. 2,50,000/-
Indian Army SSC Tech Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
Indian Army SSC Tech Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- फॉर्म भरताना Officer Entry Appln/Login’ वर क्लिक करा आणि नोंदणी करा.
- सर्व वैयक्तिक तसेच कागदपत्रांची माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर 30 मिनिटांनी उमेदवाराने रोल नंबरसह प्रिंट घ्यावी .
- अर्ज भरण्याची तारखेपर्यंत उमेदवार अर्जामध्ये काही बदल असल्यास करू शकतो.
- अपूर्ण अर्ज अपात्र केले जातील.
- अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army SSC Tech Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- १० वी चे मार्कशीट व प्रमाणपत्र
- १२ वी चे मार्कशीट व प्रमाणपत्र
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- अभियांत्रिकी पदवी/तात्पुरती पदवी (6 महिन्यांपेक्षा जुनी नसावी).
- सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक.
- CGPA/ग्रेड्सचे मार्क्समध्ये रूपांतर प्रमाणपत्र.
- उमेदवार अंतिम वर्षात शिकत असेल तर संस्थेचे प्रमाणपत्र
Indian Army SSC Tech Bharti 2025: निवड प्रक्रिया
- संरक्षण मंत्रालयाच्या (सेना) मुख्यालयाकडे अर्जांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- त्यामध्ये अंतिम वर्षातील इंजिनिअरिंग/तुलनात्मक अभ्यासक्रमातील मार्क्सच्या आधारे त्याचा कटऑफ निश्चित करू शकतात.
- जर फायनल रिझल्ट नंतर सरासरी कटऑफपेक्षा मार्क्स कमी असतील तर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवाराना ईमेल द्वारे माहिती दिली जाईल.
- मुलाखतीसाठी इलाहाबाद (उत्तर प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), बंगळुरू (कर्नाटक), जालंधर कॅंट (पंजाब) ही केंद्र आहेत.
- शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मुलाखत २ टप्प्यामध्ये घेतली जाईल.
- मुलाखतीवेळी येताना सर्व कागदपत्रांची मूळ पत्र घेऊन येणे.
- फॉर्म भरताना मिळालेली प्रिंट मुलाखती वेळी सोबत घेऊन येणे.
- मुलाखतीचा पहिला टप्पा पार केलेल्या उमेदवारांची २ ऱ्या टप्प्यामध्ये निवड केली जाईल.
- मुलाखत ५ दिवस चालेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
- वैद्यकीय चाचणी यशस्वीपने पार पडलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र पाठवले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षणादरम्यान विवाह करण्यास मनाई आहे. विवाह केल्यास उमेदवारांची नियुक्ती रद्द केली जाईल.
- १० वर्षासाठी उमेदवाराने सेवा करणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये ५ वर्षांनी स्व-इच्छेने सोडू शकतात.
- तसेच ४ वर्षांनी वाढवता ही येऊ शकते.
Indian Army SSC Tech Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्यास सुरुवात – 07 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2025
Indian Army SSC Tech Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 Full Advertisement | इथे क्लिक करा |
👉 Online Application Link | इथे क्लिक करा |
✅ Official Website | इथे क्लिक करा |