ISRO Apprentice Bharti 2025:ISRO Apprentice Recruitment 2025 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 75 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस), ITI अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरून सबमिट करायचा आहे. त्यासोबतच आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांसाची तपासणी करून पात्र उमेदवारास मुलाखतीसाठी किंवा काही पदासाठी तांत्रिक चाचणी आहे त्यासाठी बोलवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांस राविक कालावधीसाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच उमेदवारांना शिकाऊ करार (Apprenticeship Agreement) स्वीकारावा लागेल.
अपूर्ण अर्ज किंवा कागदपत्रे नसल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
ISRO Apprentice Recruitment 2025
The Indian Space Research Organisation (ISRO) has announced recruitment for 75 vacancies. This recruitment is for the posts of Graduate Apprentice Trainee, Diploma Apprentice Trainee, Diploma Apprentice (Commercial Practice), and ITI Apprentice. Applications must be submitted online.
Candidates need to visit the official website, fill out the application form, and submit it online. Along with the application, all required documents must be scanned and uploaded.
The received applications will be screened, and eligible candidates will be called for an interview or, for certain posts, a technical test. Selected candidates will be given apprenticeship training for a fixed duration.
After completing the training, an apprenticeship certificate will be issued. Also, candidates will have to accept the Apprenticeship Agreement.
Incomplete applications or applications without the required documents will not be considered. Applications received after the last date will not be entertained.
The last date to apply is April 21, 2025. Interested and eligible candidates should carefully read the advertisement PDF before applying.
ISRO Apprentice Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस), ITI अप्रेंटिस.
एकूण जागा – 75 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी | 46 |
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी | 15 |
डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस) | 05 |
ITI अप्रेंटिस | 09 |
एकूण | 75 |

ISRO Apprentice Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी
- रिसर्च आणि विकास प्रोजेक्टमध्ये मदत करणे.
- तांत्रिक दस्तऐवज तयार करणे आणि माहिती गोळा करणे.
- नवीन तंत्रज्ञान आणि प्रणाली समजून घेऊन त्यावर काम करणे.
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी
- लॅबमध्ये चाचण्या व विश्लेषण करणे.
- उपकरणांची देखभाल आणि ऑपरेशनमध्ये मदत करणे.
- प्रोजेक्टच्या कार्यसंघास सहकार्य करून आवश्यक तांत्रिक मदत पुरवणे.
डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस)
- प्रशासकीय आणि लेखाशास्त्रीय कामकाजात मदत करणे.
- दस्तऐवज व्यवस्थापन, डेटा एंट्री आणि फाइलिंगची जबाबदारी सांभाळणे.
- खरेदी, लेखा आणि इतर कार्यालयीन कामकाज हाताळणे.
ITI अप्रेंटिस
- मशिनरी आणि उपकरणे हाताळण्यास मदत करणे.
- तांत्रिक उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करणे.
- तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्रायोगिक कार्यात सहभाग घेणे.
ISRO Apprentice Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – B.E/B.Tech (Computer Science/Electronics and Communication/Electrical
- डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical and Electronics/Electronics and Communication/Civil/Computer Science)
- डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस) – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा
- ITI अप्रेंटिस – ITI (Electronics/Machinist/Fitter/Welder)
ISRO Apprentice Bharti 2025: वयोमर्यादा
- 25 ते 30 वर्षे
ISRO Apprentice Bharti 2025: वेतन
- पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – रु. 9,000/- दरमहा
- डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – रु. 8,000/- दरमहा
- डिप्लोमा अप्रेंटिस (कमर्शियल प्रॅक्टिस) – रु. 8,000/- दरमहा
- ITI अप्रेंटिस – रु. 7,000/- दरमहा
ISRO Apprentice Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- बंगळुरू, लखनऊ आणि पुरम
ISRO Apprentice Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य भरावी आणि त्यानंतरच फॉर्म सबमिट करावा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्जाची यशस्वी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, नोंदणी क्रमांक (Enrolment Number) दिला जाईल.
- अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड केली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

नवनवीन update साठी :: Click Here
ISRO Apprentice Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- डिग्री / डिप्लोमा प्रमाणपत्र (जे लागू असेल ते)
- ओळखपत्र ( आधार कार्ड / पॅन कार्ड/ मतदानकार्ड)
- राहिवासी पुरावा
- बँक खात्याची माहिती
- IFSC कोडसह खात्याचा तपशील
- पासपोर्ट साइज फोटो
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ISRO Apprentice Bharti 2025: अर्ज शुल्क
- कोणतेही अर्ज शुल्क नाही
ISRO Apprentice Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केली जाईल.
- त्यानंतर त्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
- काही पदांसाठी उमेदवारांची तांत्रिक पद्धतीने ही चाचणी घेतली जाऊ शकते.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाते.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराला शिकाऊ करार (Apprenticeship Agreement) स्वीकारावा लागतो.
- निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र दिले जाते.
ISRO Apprentice Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 27 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2025
ISRO Apprentice Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
केंद्र | NATS नोंदणी क्षेत्र | ईमेल आयडी |
---|---|---|
ISTRAC, बेंगळुरू | दक्षिण क्षेत्र | apprmt_blr@istrac.gov.in |
ISTRAC, लखनौ | उत्तर क्षेत्र | apprmt_lko@istrac.gov.in |
ISTRAC, श्री विजया पुरम | पूर्व क्षेत्र | apprmt_ixz@istrac.gov.in |
