लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा(Lek Ladki Yojana) || मुलींना महाराष्ट्र सरकार देणार 1,01,000/ रुपये

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा(Lek Ladki Yojana)::१ एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.  आपण लेक लाडकी योजना काय आहे या योजनेसाठी कोण पात्र असेल आणि लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा कसा करायचा त्याची पाहुयात…

काय आहे  लेक लाडकी योजना(Lek Ladki Yojana)

मुलींच्या जन्मास देवून मुलींचा बालविवाह रोखणे, त्यांचा शिक्षणास प्रोत्साहन देऊन शिक्षण सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे, मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांचा कुपोषण कमी करून त्यांचा मृत्यूदर कमी करणे ह्या उद्दिष्टने ही योजना सुरु करण्यात आली आहे. (लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा)

पूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना नावाने ही योजना एक ऑगस्ट 2017 पासून सुरू होती आता त्यात काही बदल करून लेक लाडकी ह्या नावाने ही योजना आणली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे आणि लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील अशी ही योजना आहे  

लेक लाडकी योजना(Lek Ladki Yojana) अंतर्गत  कशी मिळेल आर्थिक मदत ::

  • पिवळं व केशरी रेशनकार्ड असंलेल्या  कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर काही टप्प्यामध्ये विभागून  एक लाख एक हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. 
  • पात्र मुलीच्या जन्मनंतर पाच हजार रुपये.
  • ती मुलगी जेव्हा पहिलीच्या वर्गात जाईल तेव्हा  सहा हजार रुपये. 
  • मुलगी सहावीच्या वर्गात  गेल्यानंतर सात हजार रुपये. 
  • ती मुलगी जेव्हा अकरावीच्या वर्गात गेल्यानंतर आठ हजार रुपये असा विभागून टप्प्या-टप्प्याने दिले जातील. 
  • लाभार्थी मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.  
  • अशी एकूण रक्कम ५ टप्प्यात  एक लाख एक हजार रुपये(1,01,000/) त्या पात्र  मुलीला भेटणार आहेत.  
Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

कोण-कोण असेल यासाठी पात्र ;

  • ज्या कुटुंबाकडे पिवळं व केशरी रेशनकार्ड आहे अशा कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना ही योजना लागू होईल . 
  • जर त्या कुटुंबामध्ये एक मुलगा व एक मुलगी असेल तर  मुलीला हा लाभ मिळेल. 
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्याच्या वेळी अर्ज करताना  मात्र  त्यासाठी  आई-वडिलांचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आहे . 
  • जर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यानंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. 
  •  जर १ एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे तर त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे ही योजना लागू होईल. 
  •  लाभार्थीच कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  •  लाभार्थीचे बँक खातं महाराष्ट्रात पाहिजेल . 
  • ह्या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

click here

नवनवीन update साठी :: Click Here

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा(Lek Ladki Yojana)

1.या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला तुम्ही आपल्या भागातील अंगणवाडी सेवेकडे यासाठीचा अर्ज करायचा आहे . तुमचा माहितीसाठी मी अर्ज कसा आहे तो दिला आहे त्या फॉरमॅट मध्ये अर्ज करायचा आहे. 

2.अर्जामध्ये तुमची सर्व माहिती जस नाव, पत्ता,मोबाइलला नंबर आणि तुमच्या अपत्यांची माहिती द्यायची आहे. 

3.तुमच्या बँक खात्याचा डिटेल्स.

4.आणि या योजनेच्या कितव्या हफ्त्यासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. 

5.हा भरलेला अर्ज आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे आणि अर्ज केल्याची पोचपावती घ्यायची आहे. 

योजनेचा फॉर्म येथून download करा

माझी लाडकी बहीण योजना. जाणून घ्या अर्ज करण्याची नवीन तारीख

लेक लाडकी योजने साठी(Lek Ladki Yojana) कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? 

  •  लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला 
  • कुटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला. अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे  वार्षिक उत्पन्न  एक लाखाच्या आत असावे. 
  • लाभार्थी मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि पालकाच्या आधार कार्डची झेरॉक्स. 
  •  बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. 
  •  रेशन कार्ड ची झेरॉक्स (पिवळं किंवा केसरी). मतदान ओळखपत्राची झेरॉक्स. 
  •  पालकांच्या  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. 

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा ? हा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा केल्यानंतर हा अर्ज पुढील मंजुरीसाठी अंगणवाडी सेविकेद्वारे पाठवला जाईल. लाभार्थी निश्चित झालानंतर मंग सरकारकडून लाभाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये  (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर)  जमा केली जाईल.

जर लाभार्थी कुटूंब या योजनेचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर केल्यास त्यांना त्या जिल्ह्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकाऱ्याकडे पुढील टप्प्यासाठी अर्ज करावा. त्यानंतर तो अर्ज तो अधिकारी पुढील कारवाई साठी सरकारकडे पाठवेन आणि सरकार त्यावर पुढील निर्णय घेईन   

मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास, ही माहिती गरजूपर्यंत नक्की पोहचवा. धन्यवाद !!

Leave a Comment