Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2025: राज्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या नागरिकांना काम मिळावे व आर्थिक स्थिरता लाभावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. ग्रामीण भागात केलेल्या कामाची वेळेवर मजुरी मिळत नाही तसेच रोजगार ही कमी प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात पैशाचा अभाव भासतो आणि कुंटुबातील लोकांवर उपासमारीची वेळ येते. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार यांनी Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
या योजनेमध्ये 100 दिवसांपर्यत कामाची हमी केंद्र शासन देते व तिथून पुढे राज्य शासन जबाबदारी घेते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामेही घेता येतात. कामाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे कामात पारदर्शकता राहते.
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2025: योजनेची उद्दिष्टे
- ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देणे.
- नागरिकांना आर्थिक स्थिरता मिळावी म्हणून कामाचा स्रोत निर्माण करणे.
- बेरोजगारी कमी करणे.
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2025: योजनेचा फायदा
- ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिला जातोय.
- ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते.
- मजुरांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात.
- वेळेवर मजुरीची रक्कम दिली जाते.
- महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाते.

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana: पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी हवा.
- अर्ज करणारा व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवाशी हवा.
- अर्ज करणाऱ्या स्त्री किंवा पुरुष यांचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- अंग मेहनतीची कामे करण्याची तयारी असावी.
- शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana 2025: कामाचा प्रकार
- माती खणणे, बंधारे बांधणे, धरणे उभारणे, ग्रामीण रस्ते बांधणी.
- पर्यावरणपूरक आणि स्थानिक गरजांशी निगडित प्रकल्प.
- जलसंधारण, वृक्षारोपण
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana: आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र (मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा राशन कार्ड)
- बँक खाते तपशील
- ग्रामीण रहिवाशी दाखला
- ग्रामसभेची मान्यता
- रंगीत फोटो
नवनवीन update साठी :: Click Here
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana: अर्ज प्रक्रिया
- या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थ्याने ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करणे.
- ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांची भेट घ्यावी.
- त्याच्याकडून रोजगार हमी योजनेचे अर्ज घ्यावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा.
- ग्रामसेवक अर्जदाराची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भरेल व अर्जदाराला जॉबकार्ड देईल.
Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana: योजनेच्या अटी
- नोंदणी शिवाय मजुरांना काम दिले जाणार नाही.
- कमीत कमी 14 दिवस काम करणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही तर त्याला मजुरीची रक्कम दिली जाणार नाही.
- रोजगार मिळवण्यासाठी जॉबकार्ड आवश्यक आहे.
- अर्जदार बेरोजगार असणे आवश्यक आहे.

Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
रोजगार हमी योजना फॉर्म | इथे क्लिक करा |
योजनेचे Online अर्ज | इथे क्लिक करा |