WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) ही एक महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आणि कॅशलेस आरोग्यसेवा सेवा मिळावी म्हणून ही योजना राबवली जाते. ही योजना राज्यातील सर्व कुंटुंबाना कव्हर करते. या योजने अंतर्गत 1.5 लाख आणि आयुष्यमान योजने अंतर्गत 5 लाख वार्षिक आरोग्य लाभ मिळू शकतो. 1 जुलै 2024 पासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांसाठी कॅशलेस आरोग्यसेवा सुनिश्चित करत आहे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): योजनेचा उद्देश
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू लोकांना मोफत अत्यल्प खर्चात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.
- गरीब कुटुंबांवरील गंभीर आजारांमुळे होणारा आर्थिक भार कमी करणे.
- महाराष्ट्र राज्यातील आरोग्यसेवा प्रणाली अधिक प्रभावी आणि उत्तम बनवणे.
- सामान्य लोकांना गंभीर आणि दीर्घकालीन आजारांवर किफायतशीर उपचार उपलब्ध करून देणे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): पात्रता
- पिवळे रेशनकार्ड असणारे (रोजगार हमी योजना धारक).
- केशरी रेशनकार्ड असणारे (अन्न सुरक्षा योजना धारक).
- अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड असणारे
- महाराष्ट्राचे आदीवासी प्रमाणपत्र आहे पण कोणतेही रेशनकार्ड नाही असेही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): योजनेतून कव्हर होणारे आजार
- या योजने अंतर्गत १,000+ आजारांसाठी मोफत उपचार उपलब्ध आहेत.
- कार्डिओलॉजी (हृदयविकार)
- ऑर्थोपेडिक्स (हाडांचे विकार)
- न्यूरोलॉजी (मेंदू व स्नायू विकार)
- कर्करोग उपचार
- मूत्रपिंड व यकृत विकार
- डायलिसिस सेवा
- प्रसूती व नवजात बालकांचे उपचार
- बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी
- अपघात आणि ट्रॉमा केअर
- इतर गंभीर व दुर्धर आजार
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): योजना अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा व फायदे
- कॅशलेस आणि पेपरलेस उपचार – ओळखपत्र दिल्यानंतर कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत.
- या योजनेमध्ये ऑपरेशन आणि हॉस्पिटलायझेशन खर्चाचा ही समावेश होतो
- औषधोपचार तसेच आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जातात.
- रुग्णालयीन देखभाल आणि उपचारानंतर 10 दिवसांची औषधोपचार सेवा दिली जाते.
- महिला आणि बालकांसाठी विशेष सेवा उपलब्ध आहेत.
- गरीब आणि गरजूंसाठी मोफत आणि कॅशलेस उपचार केले जातात.
- 1000+ गंभीर आजारांसाठी मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार.
- सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये सुविधा दिल्या जातात.
- या योजनेमुळे गरजू कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो

नवनवीन update साठी :: Click Here
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- शाळा/कॉलेज ओळखपत्र
- पिवळी किंवा केशरी रेशनकार्ड
- आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- कृषी कामगार ओळखपत्र (शेतकरी आणि कामगारांसाठी)
- वृद्धाश्रमातील प्रमाणपत्र (वृद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांसाठी)
- अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक खाते तपशील
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): अर्ज प्रक्रिया
- या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) मंजूर असणाऱ्या हॉस्पिटलला भेट द्या.
- लाभार्थ्याने रेशनकार्ड आणि आधारकार्ड देणे आवश्यक आहे.
- रुग्णाची तपासणी केल्यानंतर कॅशलेस उपचार दिले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जा.
- तिथे “Patient Registration” हा पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
- हॉस्पिटलमध्ये जाऊन ओळखपत्र व कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY): महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Mahila Samriddhi Yojana: महिला समृद्धी योजना..! उद्योग सुरु करण्यासाठी महिलांना मिळणार कर्ज.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now