Mahila Samriddhi Yojana: महिला समृद्धी योजना..! उद्योग सुरु करण्यासाठी महिलांना मिळणार कर्ज.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mahila Samriddhi Yojana: महिला समृद्धी योजना ही केंद्र सरकारद्वारे महिला सक्षमीकरणासाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेअंर्तगत मागासवर्गीय आणि गरीब महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळते. जेणे करून त्या त्यांचा व्यवसाय सुरु करू शकतील किंवा अधिक वाढवू शकतील. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळ द्वारे ही योजना लागू केली आहे.

या योजने अंतर्गत महिला स्वयंरोजगारासाठी १ लाखांपर्यत कमी व्याजदरासह कर्ज घेऊ शकतात. लाभार्थी महिला बचत गटाच्या सदस्य असावी. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह राज्य वाहिनीकृत संस्था (State Channelizing Agencies – SCA) च्या जिल्हा कार्यालयात नेऊन देणे.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Mahila Samriddhi Yojana: योजनेचा उद्देश

  • महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरावर कर्ज देऊन आर्थिक सक्षम बनवणे.
  • वंचित महिलांच्या उद्योजगता वाढवणे व समाजात त्याचे जीवनमान उंचावणे.
  • त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणणे.

Mahila Samriddhi Yojana: योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजने अंतर्गत महिलांना कमी व्याजदरावर १ लाखांपर्यत कर्जाची रक्कम मिळणार आहे.
  • दिलेल्या रक्कमेवर कमी व्याजदर असतो त्यामुळे महिलांना कर्जाची परतफेड करण्यास सोपे जाते.
  • महिलांनी स्वतःचा व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरु करावा यासाठी ही रक्कम दिली जाते. ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतात
  • 4 वर्षांमध्ये जमेल तशी रक्कमेची परतफेड करू शकता.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Mahila Samriddhi Yojana: पात्रता

  • या योजनेसाठी फक्त महिला पात्र आहेत.
  • लाभार्थी महिलेचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • वार्षिक उत्पन्न 36,000 पेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थी महिला बचत गटाच्या सदस्य असावी.

Mahila Samriddhi Yojana: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र
  • आधारकार्ड
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बँक खाते तपशील

Mahila Samriddhi Yojana: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा NSFDC च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून घ्या.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स ची प्रत जोडा.
  • हे सर्व झाल्यांनतर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह राज्य वाहिनीकृत संस्था (State Channelizing Agencies – SCA) च्या जिल्हा कार्यालयात द्या.
  • त्यानंतर अर्जाची संपूर्ण तपासणी करून मंजुरीसाठी पुढे पाठवला जाईल.
  • अर्ज मंजूर झाल्यांनतर NSFDC कडून निधी SCA, RRB किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना वितरित केला जातो.
Mahila Samriddhi Yojana
Mahila Samriddhi Yojana

Mahila Samriddhi Yojana: महत्त्वाची लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Marathwada Gramin Vikas Sanstha Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर मध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment