Majhi ladki bahin yojana :माझी लाडकी बहीण योजना. जाणून घ्या अर्ज करण्याची नवीन तारीख || sarkariwarta.com

Majhi ladki bahin yojana :: महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपण माहिती घेऊयात  राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी माहिती समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी ३1 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे यांनी याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन दिले.  नाव नोंदणी अर्ज करणे आणि कामांसाठी होणाऱ्या गर्दीमुळे आज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याचे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ व सुटसुटीतपणे राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.आधी या योजनेसाठी 60 वय वर्ष असणाऱ्या महिला फक्त पात्रता ठरत होत्या पण  पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयोमर्यादा 65 वर्षापर्यंतच्या महिला या योजनेस पात्र ठरतील आणि जमिनीची ही अट काढण्यात आली आहे अशी माहिती सभागृहात दिली आहे .

 

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जाणार आहेत योजना गरीब महिलांसाठी असून पिवळ्या आणि  केसरी रेशन कार्ड धारकांना त्या योजनेचा लाभ भेटणार आहे, याला यात गरीब महिलांना दरम्यान पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. 

कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. दरम्यान, लाभार्थी 21 ते 60 वय असलेली महिला असेल. तसंच, त्यांचं उत्पन्न वर्षाला २,५०.,५०० पेक्षा कमी असावे हि अट आहे.

Majhi ladki bahin yojana
Majhi ladki bahin yojana

Mukhyamantri Majhi ladki bahin yojana online apply

1.मोफत असणार अर्ज भरण्याची प्रक्रिया, कसा कराल अर्ज जाणून घेऊया..

  • अर्ज भरण्याची सुविधा (तुम्ही अर्ज कुठे कुठे भरू शकता) 
  • अंगणवाडी केंद्रात
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये
  • ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस
  • सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्र
  • या ठिकाणी पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येईल . 

भरून दिलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तसेच सेतू सुविधा केंद्र मध्ये तेथील कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन भरला जाईल आणि ही प्रक्रिया एकदम विनामूल्य असेल असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

 

2.Majhi ladki bahin yojana योजनेचे स्वरूप नेमके काय आहे

ज्या महिला या योजनेस पात्र ठरतील त्यांच्या स्वतःच्या आधार कार्ड लिंक असलेल्या स्वतःच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारकडून दरमहा दीड हजार (1500)रुपये जमा होतील. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये दीड हजार (1500)पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.

 

 

3.Majhi ladki bahin yojana योजनेचे लाभार्थी कोण कोण असतील ते आपण जाणून घेऊयात

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला  विवाहित , विधवा,घटस्फोटीत आणि निराधार महिला अशा सर्व महिला या योजनेच्या लाभार्थी ठरतील 

 

आता आपण जाणून घेऊयात नेमकं कोणत्या महिला या लाडकी बहीण योजना यायासाठी  पात्रता काय असणे गरजेचे आहेत ते जाणून घेऊयात ….

  1. जे कोणी लाभार्थी महिला असेल ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे
  2. महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सर्व विवाहित विधवा घटस्फोटीत परियकरीत्या आणि निराधार महिला या योजनेस पात्र ठरतील
  3. या योजनेसाठी किमान वयाची 21 वर्षे पूर्ण असावीत आणि कमाल वयाची 65 वर्ष होईपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  4. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे असे  स्वतंत्रबँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल
  5. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/- जास्त नसावे याची महिलेने फॉर्म भरण्याअगोदर नोंद घ्यावी.

4.अपात्रता  (कोणत्या महिला या योजनेचा फॉर्म भरू शकत नाहीत)

 

  1.  कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला या योजनेचा फॉर्म भरू शकत नाहीत
  2.  ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. 
  3. ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये असतील त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही
  4. सदर लाभार्थी महिलेने इतर कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ लाभ घेतलेला नसावा
  5. लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावेत 
  6. जास्त सदस्य कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून )नोंदणी करत आहे अशा व्यक्तींना या  योजनेचा लाभ घेता येणार नाही

click here

                       नवनवीन update साठी :: Click Here

Mukhyamantri majhi ladki bahin yojana form  भरण्याची प्रक्रिया 

  • अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै
  • अर्ज करण्याची शेवट तारीख : ३१ ऑगस्ट 

 

Majhi ladki bahin yojana (माझी लाडकी बहिण योजना साठी आवश्यक कागदपत्रे )
Majhi ladki bahin yojana Required Documents:

  • ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
  • आधार कार्ड 
  • राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित असायला हवी. 
  • उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका,
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म.

हे ही वाचा :: लेक लाडकी योजना(Lek Ladki Yojana)

नारी शक्ती दूत ॲपवरून ऑनलाइन अर्ज कसा करावा.

महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलाही नारी शक्ती दूत ॲपद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी…

  1. नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल.
  2. ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ते स्थापित करावे लागेल आणि नंतर प्रथम तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल.
  3. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला मांझी लाडकी बहिन योजना निवडावी लागेल.
  4. यानंतर,  एक फॉर्म उघडेल जो भरून सबमिट करावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज करू शकता.

 

Leave a Comment