MPKV Bharti 2025: MPKV Recruitment 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदाची भरती जाहीर झाली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीयरच्या 3 आणि सिव्हिल इंजिनीयरच्या 4 अशा एकूण 07 रिक्त जागा भरायच्या आहेत. ही भरती तात्पुरती स्वरूपाची कंत्राटी आहे. या दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. त्यानंतर उमेदवाराचा अनुभव विचारात घेऊन आणि मुलाखती द्वारे निवड केली जाईल.
निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. निवड झालेल्या उमेदवाराला वेतनाशिवाय इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत. निवड झालेल्या उमेदवाराने रु.500 च्या स्टँप पेपरवर करार करून देणे बंधनकारक आहे. विद्यापीठाची परवानगीशिवाय खाजगी व्यवसाय केल्यास कोणत्याही नोटिस शिवाय पदावरून काढले जाऊ शकते. कार्यकाळ संपल्यानंतर सेवा आपोआप संपुष्टात येईल.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. विद्यापीठ अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी-413722 या पत्त्यावर अर्ज आणि त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची कॉपीज पोस्टाने किंवा स्व-हस्ते पाठवून द्या. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
MPKV Recruitment 2025
Under Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Ahmednagar, recruitment has been announced for the post of Junior Engineer. A total of 07 vacancies are to be filled, with 03 vacancies for Electrical Engineer and 04 vacancies for Civil Engineer. This recruitment is on a temporary contractual basis. Experience is required for both positions.
The received applications will be screened, and eligible candidates will be shortlisted. Selection will be based on experience and an interview.
The decision of the selection committee will be final. Selected candidates will not receive any allowances other than salary. The selected candidate must sign an agreement on a ₹500 stamp paper. If the candidate engages in private business without university permission, they will be removed from the post without any notice. The service will automatically end after the contract period.
The application must be submitted offline. Applications should be sent by post or hand-delivered to:
University Engineer, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri – 413722
It is mandatory to attach copies of all required documents with the application. Applications received after the last date will not be considered.
The last date to apply is April 9, 2025. Interested and eligible candidates should carefully read the official advertisement PDF before applying.
MPKV Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता
एकूण जागा – 07 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | 03 |
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) | 04 |
नवनवीन update साठी :: Click Here
MPKV Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
- विद्युत कामांचे साइट चे निरीक्षण करणे.
- साइटवरील साहित्याची तपासणी करणे.
- विद्यापीठ परिसरातील विद्युत साहित्य/यंत्रणा देखभाल व सुरक्षा करणे.
- विद्यापीठ अभियंत्यांकडून दिलेले इतर कार्य पार पाडणे.
- नवीन प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करणे.
- त्याचे निविदा प्रक्रिया व देखरेख करणे.
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
- विद्यापीठ परिसरातील देखभाल आणि दुरुस्ती करणे.
- विद्यापीठ अभियंत्यांकडून दिलेले इतर कार्य पार पडणे
- नवीन प्रकल्पांचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रक्रिया व देखरेख करणे.
MPKV Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची विद्युत अभियांत्रिकीतील पदवी किंवा डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी किंवा डिप्लोमा |
MPKV Bharti 2025: वयोमर्यादा
- 38 वर्षे
MPKV Bharti 2025: अनुभव
- या दोन्ही पदासाठी त्या क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
MPKV Bharti 2025: वेतन
- कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – दरमहा रु. 25,000/-.
- कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – दरमहा रु. 25,000/-.

MPKV Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी जाहिरातीच्या pdf सोबत असणारा अर्ज डाउनलोड करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- तसेच त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
- भरलेला अर्ज विद्यापीठ अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी-413722 या पत्त्यावर पाठवून द्यावा.
- अर्ज पोस्टाने किंवा स्व-हस्ते पाठवावा.
- शेवटच्याच्या तारखेपूर्वी आलेले अर्जच स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
MPKV Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- विद्यापीठ अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी-413722
MPKV Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- अहमदनगर
MPKV Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- जन्मतारीखेचे प्रमाणपत्र (१० वीचे प्रमाणपत्र )
- नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शुल्क भरल्याचा पुरावा
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- निवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
MPKV Bharti 2025: अर्ज शुल्क
- सर्व उमेदवारांसाठी – रु. 300/-
MPKV Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
- निवड करताना उमेदवारांचा अनुभव विचारात घेतला जाईल.
- त्या उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
- निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
- हि नेमणूक तात्पुरती स्वरूपाची ६ महिन्याच्या कंत्राटावर होणार आहे.
- उमेदवाराला वेतन व्यतिरिक्त इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही.
MPKV Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 24 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2025
MPKV Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
NHM Mumbai Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड!!
