Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024(मृदा आणि जलसंधारण विभाग भरती 2024) :: नमस्कार मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागाद्वारे 670 जागा साठी भरतीचे जाहिरात आलेली आहे चला जाणून घेऊया अर्ज करण्याचा कालावधी पात्रता आणि त्यासंबंधी इतर गोष्टी..
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 यामध्ये मृदा व जलसंधारण विभागामध्ये जलसंधारण अधिकारी स्थापत्य हे ब गटातील पद असून या 670 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करण्याचा कालावधी हा 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 असणार आहे ह्या ब गटासाठी जे वेतन असेल ते 41 हजार 800 ते 1 लाख 32 हजार 300 या दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार असेल.
एकूण 670 पदांमध्ये आरक्षणा नुसार वेगवेगळ्या पदांसाठी काही पदे आरक्षित असतील महिलांसाठी 30% व खेळाडूसाठी पाच टक्के पदे हे त्यांच्या वर्गात आरक्षित आहेत त्यानुसार 670 पदांपैकी 201 पदे महिलांसाठी व 34 पदे खेळासाठी राखीव आहेत.
अ.क्र | पद | प्रवर्ग | पदसंख्या |
1 | जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) | अनुसूचित जाती | 85 |
अनुसूचित जमाती | 56 | ||
विमुक्त जाती (अ) | 17 | ||
भटक्या जाती (ब) | 15 | ||
भटक्या जाती (क) | 19 | ||
भटक्या जाती (ड) | 13 | ||
विशेष मागास प्रवर्ग | 16 | ||
इतर मागास प्रवर्ग | 129 | ||
ईडब्ल्यूएस | 67 | ||
अराखीव | 253 | ||
एकूण | 670 |
मृदा आणि जलसंधारण विभाग भरती २०२४ साठी पात्रता
- भारतीय नागरिक असावा
- वयोमर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी 19 वर्ष ते 38 वर्षे आहे
- मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा 19 ते 43 वर्ष आहे
- दिव्यांग व्यक्तीसाठी ही मर्यादा 45 वर्षे आहे
- अनाथ व खेळाडूंसाठी वयाची मर्यादा आहे 43 वर्ष.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) | उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची Diploma in Civil Engineering किंवा Degree in Civil Engineering किंवा शासन मान्य समकक्ष म्हणुन घोषीत केलेली पात्रता व अहर्ता. |
नवनवीन update साठी :: Click Here
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 साठी परीक्षेचा फॉरमॅट
S.No | विषय | प्रश्न संख्या | गुण | प्रश्नपत्रिकेचे माध्यम | परीक्षेचा कालावधी |
1 | मराठी | १० | २० | मराठी | १२० मिनिटे |
2 | इंग्रजी | १० | २० | इंग्रजी | |
3 | सामान्यज्ञान | १० | २० | मराठी व इंग्रजी | |
4 | बुद्धिमापन चाचणी | १० | २० | मराठी व इंग्रजी | |
5 | तांत्रिक | ६० | १२० | इंग्रजी | |
6 | एकूण | १०० | २०० |
- 💵 अर्जाची फी(Exam Fee) –अमागास 1000/- रुपये [ मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग 900/- रुपये ]
- 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date of Application) – 10 जानेवारी 2024
मृदा आणि जलसंधारण विभाग भरती 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत :
1.या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करता येतील
2.खाली दिलेल्या लिंक वरती अर्ज भरायचा आहे
3.अर्ज भरल्यानंतर आवश्यक असलेली परीक्षा फी भरल्याशिवाय अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
4. परीक्षा शुल्क करण्याची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे
5.परीक्षा शुल्क भरण्याचा पेमेंट सक्सेस असा मेसेज आल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय आपल्या खात्यातून लॉग आउट करू नये.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
📃 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
🔗 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 साठी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड.
- वयाच्या पुराव्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा जन्म दाखला गृहीत धरण्यात येईल.
- सर्व शैक्षणिक कागदपत्रे.
- जर उमेदवार मागासवर्गीय असेल तर मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
- नॉन क्रिमिलियर चा दाखला.
- अपंगासाठी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.
- विवाहित स्त्रियांसाठी नावात बदल झाल्याचा पुरावा.
- खेळाडूंच्या आरक्षणासाठी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र.
- लहान कुटुंब प्रमाणपत्र.
- पासपोर्ट साईज फोटो.
- आधार कार्ड.
हे ही वाचा :: राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अकॅडमी साठी 400 जागांची जाहिरात
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 साठी महत्वाच्या सूचना
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- अर्ज सुरु होण्याची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे .
- तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची व फी भरण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024आहे.
- ही परीक्षा, परीक्षा केंद्रावर online पद्धतीने होणार आहे.
- दिलेल्या कालावधी मध्ये अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्क पेमेंट गेटवे डेबिट क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग ने भरता येईल
- परीक्षा शुल्क दिलेल्या वेळेत भरावं, त्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवाराला विचारात घेतले जाणार नाही.
- payment Successful असा मेसेज आल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय परीक्षा फी भरली गेली असे समजू नये.
- परीक्षा शुल्क जर फेल झाले तर दिलेल्या वेळेत पुन्हा भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारास मराठी लिहता, वाजता आणि बोलता येणे गरजेचे आहे.
- फॉर्म भरताना परीक्षा केंद्र निवडावे, एकदा निवडलेले परीक्षा केंद्र पुन्हा बदलता येणार नाही.
- अयोग्य वर्तन केल्यास उमेदवारावर कारवाई केली जाईल.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अपूर्ण किंवा चुकीची असल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- उमेदवाराची निवड झाल्यास त्याला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल
- दिलेल्या सूचनांचे व्यवस्तित पालन करावे कारण चुकीचे अर्ज बाद ठरवले जातात.
- दिलेल्या कालावधीतच अर्ज करावा नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जात नाहीत.
- आवश्यक कागदपात्रांची सॉफ्ट कॉपी दिलेल्या size मध्ये अपलोड करावी.
ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहचवा … ह्यामधून एकाला जरी काम भेटलं तर आमचा हेतू साध्य झाल्याचा आनंद आम्हाला मिळेल. धन्यवाद 🙏