MSRLM Akola Bharti 2025: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत “IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजुला, रामदास पेठ, अकोला- 441001 आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
MSRLM Akola Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 08
पदाचे नाव – IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP
पदांची माहिती टेबल स्वरूपात:
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
IFC ब्लॉक अँकर | 02 |
वरिष्ठ CRP | 06 |
MSRLM Akola Bharti 2025: वयोमर्यादा
43 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
MSRLM Akola Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- IFC ब्लॉक अँकर – बी.एस्सी. (कृषी) किंवा बी.एस्सी. (फळबाग शास्त्र), बी.टेक. (कृषी), बी.एस्सी. (मत्स्यशास्त्र), बी.एस्सी. (वनशास्त्र), बी.व्ही.एस्सी (पशुवैद्यकीय विज्ञान) आणि बी.एस्सी. (प्राणी संवर्धन), बी.बी.ए. (बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन), एमएससीआयटी (MS-CIT)
- वरिष्ठ CRP – किमान १२वी उत्तीर्ण
MSRLM Akola Bharti 2025: वेतन
IFC ब्लॉक अँकर – 20,000
वरिष्ठ CRP – 6000
निर्धारित मासिक प्रवास देयक रु. 1500/- पर्यंत समाविष्ट राहील. मूल्यमापन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल.)
सदर मानधन एकात्मिक शेती प्रोत्साहन संघाच्या मालकीच्या निधीतून करण्यात येईल.
MSRLM Akola Bharti 2025: अनुभव
- IFC ब्लॉक अँकर – 1 वर्षे
- वरिष्ठ CRP – 3 वर्षे
MSRLM Akola Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
अकोला

MSRLM Akola Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MSRLM Akola Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), शासकीय अध्यापक विद्यालयाच्या बाजुला, रामदास पेठ, अकोला- 441001
MSRLM Akola Bharti 2025: भूमिका व जबाबदाऱ्या
IFC ब्लॉक अँकर
- कार्यक्षेत्रातील प्रकल्पातील CRP व इतर समुदाय संसाधन व्यक्तींच्या सहकार्याने प्रकल्पाचे नियोजन करणे.
CRP कडून प्रकल्पातील मुलींचे सर्वेक्षण करून, मिळालेल्या माहितीच्या आधारावर सूक्ष्म योजना तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे. - प्रकल्पाच्या प्रगतीचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल LSC व तालुका अभियान कक्षास सादर करणे.
- प्रकल्पातील महिलांच्या उपक्रमांना (जसे की शेती संबंधित उपक्रम) पद्धतशीर मार्गदर्शन व सहाय्य करणे.
- प्रकल्पाचा मासिक कृती आराखडा तयार करून, तो प्रमाणित आराखड्यानुसार कामे सुरळीत पार पाडणे.
- प्रकल्पातील उत्पादन विकास व संबंधित मार्केटिंग उपक्रमांची अंमलबजावणी करणे.
- प्रकल्पातील एकत्रीकरण केंद्रे (Processing Unit, Collection Center) व संलग्न यंत्रणा यांची देखरेख करणे व महिलांना तांत्रिक सहाय्य करणे.
- LSC व प्रकल्पाच्या कार्यप्रवृत्तींमध्ये नियमित आढावा घेणे, MIS अद्यावत ठेवणे.
वरिष्ठ CRP
- CRP च्या क्लस्टरमधील गावपातळीवर उपजीविका CRP च्या माध्यमातून प्रशिक्षण देणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
- उपजीविका उपक्रम वाढवणे आणि संसाधन सेवा केंद्राचे व्यवस्थापन पाहणे.
- एकात्मिक शेती प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचवणे.
- IFC प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजन आराखड्यानुसार शेतकऱ्यांची उपक्रम नोंदणी माहिती तयार करणे आणि ती CLF व LSC समितीसमोर सादर करणे.
- प्रकल्पाचे लेखे अद्यावत ठेवणे.
- उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी प्रकल्पाला सहाय्य करणे.
- प्रकल्पातील महिलांच्या उपक्रमांना प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करणे.
- नियमित प्रशिक्षणाचे नियोजन व अहवाल सादर करणे.
- मासिक कामाचा अहवाल IFC ब्लॉक अँकर व LSC समितीसमोर सादर करणे.
- प्रकल्पातील VO सोबत समन्वय साधून काम करणे.
MSRLM Akola Bharti 2025: निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा – 40 गुण.
प्रत्यक्ष मुलाखत – 10 गुण
तोंडी परीक्षेमध्ये संवाद कौशल्य, कामाचा अनुभव, प्रामाणिकपणा इ. बाबींचा आधार घेत गुणांकन केले जाईल.
लेखी परीक्षेची पातळी 12 वीचे असेल.
IFC ब्लॉक अँकर
लेखी परीक्षेतील विषय व गुणफलक:
बुद्धिमत्ता चाचणी – 5 गुण
रचनात्मक लेखन – 5 गुण
कृषी व कृषी संबंधित – 30 गुण
सदर परीक्षा बहुपर्यायी (Multiple Choice) पद्धतीने होईल.
वरिष्ठ CRP
लेखी परीक्षेत कृषी व कृषी संबंधित विषयांवर 50% प्रश्न असतील.
तोंडी परीक्षा 10 गुणांची असेल. तोंडी परीक्षेमध्ये संवाद कौशल्य, कामाचा अनुभव, प्रामाणिकपणा इत्यादी निकषांवर गुणांकन केले जाईल.
लेखी व तोंडी परीक्षेचे गुण एकत्र करून सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.
MSRLM Akola Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024
MSRLM Akola Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात आणि अर्ज नमुना | ईथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | ईथे क्लिक करा |