mukhyamantri vayoshri yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये

mukhyamantri vayoshri yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने  ६५ वर्ष व त्यापुढे वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी  मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri  Vayoshri Yojana) ही योजना जाहीर केली आहे. ६५ वर्ष व त्यापुढे वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार  त्यांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा करेल.  ह्या योजनेचा हेतू काय आहे, कोण असेल पात्र, कसा करायचा अर्ज ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून  घेऊ.  

राज्यातील ६५ वर्ष व त्यापुढे वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर वयोमानानुसार येणारे अपंगत्व,अशक्तपणा  त्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे खरेदीसाठी व  ह्या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य केले जाईल.   

mukhyamantri vayoshri yojana
mukhyamantri vayoshri yojana

🌟 mukhyamantri vayoshri yojana : योजनेची ठळक वैशिष्ट्ये

मुख्यमंत्री वयोश्री योजना च्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. 🔑 मुख्य वैशिष्ट्य 1: जेष्ठ नागरिकांना एकदाच 3,000 रुपये दिले जातील.
  2. 🔑 मुख्य वैशिष्ट्य 2: ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
  3. 🔑 मुख्य वैशिष्ट्य 3: वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असलेले जेष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.

click here

नवनवीन update साठी :: Click Here

📋 mukhyamantri vayoshri yojana : पात्रता निकष

मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

👥 पात्र गट:

  • ह्या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने ३१ डिसेंबर २०२३ अखेर आपल्या वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. 
  • पात्र  व्यक्तीचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असावे  
  • लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. 

🔢 वय / उत्पन्न मर्यादा:

  • वय:  वय ६५ वर्ष पूर्ण असावीत 
  • वार्षिक उत्पन्न: कौटुंबिक उत्पन्न मर्यादा २ लाख वार्षिक 

📄 आवश्यक कागदपत्रे:

  • कार्ड किंवा मतदानकार्ड 
  • अर्जदाराचे स्वयं-घोषणापत्र  
  • राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुक चे झेरॉक्स 
mukhyamantri vayoshri yojana
mukhyamantri vayoshri yojana

📝 mukhyamantri vayoshri yojana अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. 🔸 अर्ज फॉर्म भरणे:
    • सध्या, ह्या योजनेसाठी  फक्त ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म प्रक्रिया सुरू झालेली नाही.

खाली दिलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी  आणि फॉर्ममध्ये खालील माहिती भरावी:

  • पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक
  • वार्षिक उत्पन्न
  • बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र कोपऱ्यात चिकटवावे.
  • हा फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जिल्हा समाज कल्याण विभाग किंवा तालुका समाज कल्याण कार्यालयात जमा करावीत.

मुख्यमंत्री वयोश्री योजना फॉर्म इथून डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिक कार्ड कसे काढावे ?

💼 mukhyamantri vayoshri yojana : लाभ आणि फायदे

[योजनेचे नाव] च्या लाभार्थ्यांना खालील फायदे मिळतील:

  1. 💰 आर्थिक लाभ: जेष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये एकरकमी मिळतील.
  2. खालील उपकरण खरेदी जर करायचे असतील तर लाभार्थी याचा वापर करू शकतो आणि ही रक्कम आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटीमार्फत सरकार खात्यामध्ये जमा करेल
    • चष्मा
    • श्रावणयंत्र
    • ट्रायपॉड , व्हील चेअर
    • फोल्डिंग वॉकर
    • कमोड खुर्ची
    • नि -ब्रेस
    • लंबर बेल्ट
    • सवाइकल कॉलर इ.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न: mukhyamantri vayoshri yojana साठी कोण अर्ज करू शकतो?

उत्तर: ६५ वर्ष व त्यापुढे वय असणाऱ्या जेष्ठ नागरिक

प्रश्न: मला mukhyamantri vayoshri yojana अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

उत्तर: आधारकार्ड किंवा मतदानकार्ड ,अर्जदाराचे स्वयं-घोषणापत्र ,राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुक चे झेरॉक्स.

Leave a Comment