NBT Bharti 2025: National Book Trust Recruitment 2025. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया येथे यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदाची भरती जाहीर झाली आहे. यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदाच्या 2 आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) पदासाठी 1 अशा एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. या दोन्ही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे. अर्ज आल्यानंतर तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
त्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज उपसंचालक (ई अँड ई) नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली – 110070 या पत्त्यावर करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी असणे ही आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
National Book Trust Recruitment 2025
National Book Trust, India has announced recruitment for the posts of Young Professional (Corporate Communication) and Marketing Executive (Corporate Communication). A total of 03 vacancies will be filled through this recruitment, with 02 vacancies for Young Professional (Corporate Communication) and 01 vacancy for Marketing Executive (Corporate Communication). Experience is required for both positions.
After receiving the applications, eligible candidates will be shortlisted. Shortlisted candidates will be called for a written test or interview.
The application must be submitted offline. Applications should be sent to:
Deputy Director (E & E), National Book Trust, India, 5, Institutional Area, Phase-2, Vasant Kunj, New Delhi – 110070
It is mandatory to attach xerox copies of all necessary documents along with the application.
The last date to apply is April 5, 2025. Interested and eligible candidates should carefully read the official advertisement PDF before applying.
NBT Bharti 2025 Notification
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)
एकूण जागा – 03 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) | 02 |
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) | 01 |

NBT Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)
- NBT संबंधित प्रेस रिलीज, ब्लॉग्ज, लेख, अहवाल आणि प्रेझेंटेशन तयार करणे.
- कॉर्पोरेट इव्हेंट्स, परिषद, वेबिनार आणि CSR उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
- जाहिरात आणि प्रमोशनल कसे करता येईल याबद्दल आयडिया देणे.
- मीडिया हाऊसेस, पत्रकार आणि PR एजन्सींसोबत समन्वय साधणे.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन)
- संस्थेच्या सेवा आणि उत्पादनांची जाहिरात आणि प्रचार करण्यासाठी मार्केटिंग कसे करता येईल हे बघणे.
- नवीन संधी शोधून NBTचा व्यवसायवाढीस मदत करणे.
- बाजारातील ट्रेंड, स्पर्धक आणि ग्राहकांच्या गरजा यांचा अभ्यास करणे.
- डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया आणि पारंपरिक मार्केटिंग चॅनेल्सचा उत्तम वापर कसा करता येईल हे बघणे.
NBT Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) | कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा MBA |
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) | कोणत्याही शाखेतील पदवी |
NBT Bharti 2025: वयोमर्यादा
- 28 वर्षे ते 32 वर्षे
NBT Bharti 2025: अनुभव
- दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक आहे.
- यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदासाठी किमान 1 ते 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
- मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदासाठी किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
नवनवीन update साठी :: Click Here
NBT Bharti 2025: वेतन
- यंग प्रोफेशनल (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – रु. 50000 ते रु.70000 दरमहा
- मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – रु.40000 ते रु. 55000 दरमहा
NBT Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- दिल्ली
NBT Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- जाहिरातीच्या Pdf सोबत असलेल्या अर्जाची प्रिंट डाउनलोड करावी.
- अर्जामध्ये योग्य व अचूक माहिती भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी जोडावी.
- भरलेला अर्ज उपसंचालक (ई अँड ई) नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली – ११००७० या पत्त्यावर पाठवून द्यावा.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अपूर्ण अर्ज किंवा अर्जासोबाबत आवश्यक कागदपत्रांची कॉपी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जासोबत शिफारस किंवा दबाव टाकल्यास अर्ज नाकारला जाईल.
NBT Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता
- उपसंचालक (ई अँड ई) नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली – ११००७०
NBT Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (पदवी / पदव्युत्तर पदवी / MBA)
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदानकार्ड)
- पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास)
- अन्य संबंधित कागदपत्रे (संस्था आवश्यकतेनुसार)
NBT Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी केली जाईल.
- त्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट करून त्यांना लेखी परीक्षा किंवा मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
- लेखी परीक्षा किंवा मुलाखत झाल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.
- नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाईल.
- निवड प्रक्रियेबाबत NBT चा निर्णय अंतिम असेल.
NBT Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 25 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2025
NBT Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
