नमस्कार मित्रांनो UPSC कडून 2024 साठी एनडीए अँड एनए(Nation defence academy & naval academy) साठी जाहिरात (NDA And NA 2024)आलेली आहे ही NDA ची exam यूपीएससी द्वारे वर्षात दोनदा घेतली जाते त्याचप्रमाणे साल 2024 साठी याची पहिली जाहिरात यूपीएससीने जारी केली आहे या परीक्षेसाठी बारावी पास व त्याचबरोबर सध्या बारावी मध्ये असणारे विद्यार्थीही पात्र असतात व त्यासाठी अर्ज करू शकतात.
NDA And NA 2024 द्वारे सैन्यात अधिकारी होण्याची ही खूप मोठी संधी असून मानाचा जीवन जगण्याची ही उत्तम संधी मिळते. पूर्वी ही परीक्षा फक्त पुरुष अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी व्हायची पण आता सरकारने स्त्रियांनाही एनडीए मध्ये संधी देण्याचं ठरवलं आहे आणि त्यानुसार स्त्री व पुरुष दोन्हींसाठी ही भरती होत आहे. याद्वारे उमेदवार वायुसेना,नौसेना आणि लष्कर यामध्ये प्रवेश घेऊ शकतात उमेदवार जर बारावी मध्ये किंवा बारावीच्या कोणत्याही शाखेद्वारे पास झाला असेल तर तो लष्करामध्ये जाऊ शकतो पण एअर फोर्स किंवा नेव्ही साठी एक अट आहे ती म्हणजे उमेदवार हा बारावी सायन्स मधून फिजिक्स केमिस्ट्री मॅच या विषयांमधून पास असावा किंवा हे विषय घेऊन बारावी विज्ञान मध्ये शिकत असावा.
अँप्लिकेशन ची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 असून upsconline.nic.in जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. या परीक्षेसाठी पेपर चे स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा असून यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असेल म्हणजे चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार आहेत.
परीक्षा केंद्र हे पूर्ण भारतभर असून उमेदवार आपल्या सोयीचे परीक्षा केंद्र निवडू शकता. ही प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवार हा अविवाहित असावा त्याचबरोबर त्याचा जन्म 2 जुलै 2005 ते 1 जुलै 2008 या दोन तारखेला व त्याच्या दरम्यान झालेला असावा, व ज्यांचे वय ह्यादरम्यान आहे तेच उमेदवार NDA And NA 2024 यासाठी अप्लाय करू शकतात.
NDA And NA 2024 साठी एकूण जागा
NDA/NA | विभाग | एकूण जागा |
नॅशनल डिफेन्स अकादमी (National Defence Academy) | Army | 208 (यातील 10 जागा महिला उमेदवारासाठी राखीव ) |
Navy | 42 (यातील १२ जागा महिला उमेदवारासाठी राखीव) | |
Air Force | (i) Flying – 92 (यातील 02 जागा महिला उमेदवारासाठी राखीव) (ii) Ground Duties (Tech) – 18 (यातील 02 जागा महिला उमेदवारासाठी राखीव) (iii) Ground Duties (Non Tech) – 10 (यातील 02 जागा महिला उमेदवारासाठी राखीव) | |
Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) | 30 (यातील 09 जागा महिला उमेदवारासाठी राखीव) | |
एकूण जागा | 400 |
NDA And NA 2024 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक आवश्यकता |
Army Wing of National Defence Academy | १२ वी पास किंवा १२ वी च्या वर्गात |
For Air Force and Naval Wings of National Defence Academy and for the 10+2 Cadet Entry Scheme at the Indian Naval Academy) | १२ वी पास(Physics, Chemistry आणि Mathematics ह्या विषयासह पास) किंवा १२ वी च्या वर्गात((Physics, Chemistry आणि Mathematics ह्या विषयासह) असलेले |
- वयाची मर्यादा(Age Limit) – ज्यांचा जन्म जन्म 2 जुलै 2005 ते 1 जुलै 2008 (ह्या दोन तारखा पकडून) च्या दरम्यान झाला आहे असे
- उमेदवार हा अविवाहित असावा.
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- नेपाळ चे नागरिक
- पाकिस्तान, बुऱमा, केनिया, युगांडा टांझानिया, इथोपिया,व्हिएतनाम ह्या देशातील उमेदवार जे कायमस्वरूपी भारतात स्थलांतरित झालेत असे.
- नेपाळ, पाकिस्तान, बुऱमा, केनिया, युगांडा टांझानिया, इथोपिया,व्हिएतनाम ह्या देशातील स्थलांतरित उमेदवार कडे भारत सरकारने दिलेले पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- 📍 नोकरीचे ठिकाण(Job Location) – संपूर्ण भारतभर .
- 💵 अर्जाची फी(Exam Fee) – General/OBC साठी ₹100/- रुपये – (महिला /SC/ST/PWD/ExSM/ साठी – कोणतीही फी नाही )
- 🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date of Application) – 9 जानेवारी 2024
- परीक्षा: 21 एप्रिल 2024
नवनवीन update साठी :: Click Here
NDA And NA 2024 परीक्षेचे स्वरूप
परीक्षेचे विषय | मार्क्स |
Mathematics | 300 |
General Ability Test | 600 |
Total | 900 |
NDA & NA 2024 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ?
- भारतीय UPSC च्या अधिकृत वेबसाइट https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php ला भेट द्या.
- तुम्ही नवीन असल्यास प्रथम तुमची आवश्यक माहिती भरून रेजिस्ट्रेशन करा.
- रेजिस्ट्रेशनपूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि अर्ज भरा .
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म submit करण्यापूर्वी एकदा काळजीपूर्वक वाचा .
- फॉर्म submit केल्यानंतर डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.(NDA And NA 2024)
📃 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
🔗 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे ही वाचा :: भारतीय नौदलात नौकरीची संधी -910 जागांसाठी भरती || पात्रता १० वी पास
NDA And NA 2024 साठी महत्वाच्या सूचना
- या भरतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
- जर उमेदवाराने फॉर्म भरला असेल आणि त्याला जर त्यात दुरुस्ती करायची असेल तर फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर ७ दिवसामध्ये दुरुस्ती करता येईल.
- फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याचा कालावधी 10.01.2024 ते 16.01.2024. असेल
- दिलेल्या सूचनांचे व्यवस्तित पालन करावे कारण चुकीचे अर्ज बाद ठरवले जातात.
- परीक्षेच्या आवारात मोबाईल, ब्लूटूथ नेण्यास मनाई आहे .
- आवश्यक कागदपात्रांची सॉफ्ट कॉपी दिलेल्या size मध्ये अपलोड करावी
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.