NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NHAI Bharti 2025: NHAI Recruitment 2025.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदाची भरती जाहीर झाली आहे. यासाठी मुख्य महाव्यवस्थापक पदाच्या ०३ आणि महाव्यवस्थापक पदाच्या ०२ अशा एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

या पदांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. यासाठी आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांस अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर माघारी घेता येणार नाही. निवड झाल्यानंतर नियुक्ती स्वीकारली नाही तर त्या उमेदवारांस २ वर्षे अपात्र ठरवले जाईल.


उमेदवार ऑफलाइन/ऑनलाइन असा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करतेवेळी सर्व माहिती अचूक व योग्य असावी तसेच मुलाखीतीला येताना मूळ कागदपत्रांच्या प्रती घेऊन येणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी श्री राजेश चौधरी, उपसचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, कक्ष क्रमांक २३९, वाहतूक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१ हा पत्ता आहे.

एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करावा लागेल. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२५ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

NHAI Recruitment 2025.

The National Highways Authority of India has announced the recruitment of Chief General Manager, General Manager. This recruitment will be conducted to fill a total of 05 vacancies, including 03 for the post of Chief General Manager and 02 for the post of General Manager.

These posts will be selected through interview. After examining the applications received for this, eligible candidates will be called for interview. Candidates must have experience for both the posts. Applications cannot be withdrawn after submission. If the appointment is not accepted after selection, those candidates will be disqualified for 2 years.

Candidates can apply in both offline/online modes. All the information should be accurate and correct while applying and it is necessary to bring copies of original documents while coming for the interview. The address for offline application is Shri Rajesh Chaudhary, Deputy Secretary, Ministry of Road Transport and Highways, Room No. 239, Pahap Bhawan, Sansad Marg, New Delhi-110001.

If you wish to apply for more than one post, you will have to submit a separate application for each post. Applications received after the last date will not be considered. The last date for application is 13th May 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

NHAI Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक
एकूण जागा – 05 जागा

पदाचे नावपद संख्या
मुख्य महाव्यवस्थापक03
महाव्यवस्थापक02

The National Highways Authority of India Bharti 2025
The National Highways Authority of India Bharti 2025

NHAI Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मुख्य महाव्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी
  • महाव्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून लॉ ची पदवी

NHAI Bharti 2025: वयोमर्यादा

  • 58 वर्षे

NHAI Bharti 2025: अनुभव

दोन्ही पदासाठी अनुभव आवश्यक आहे.

  • मुख्य महाव्यवस्थापक – किमान 17 वर्षांचा अनुभव आवश्यक. त्यापैकी किमान 10 वर्षांचा अनुभव करार विषयक मध्यस्थी, कायदेविषयक काम किंवा जमीन अधिग्रहणाच्या क्षेत्रात असावा.
  • महाव्यवस्थापक – पदवीनंतर किमान 14 वर्षांचा अनुभव आवश्यक. त्यापैकी किमान 6 वर्षांचा अनुभव करार विषयक मध्यस्थी, कायदेविषयक काम किंवा जमीन अधिग्रहणाच्या क्षेत्रात असावा

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

NHAI Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य महाव्यवस्थापक स्तर – 14 दरमहा रु. 1,44,200 ते 2,18,200
महाव्यवस्थापक स्तर – 13 दरमहा रु. 1,23,100 ते 2,15,900

NHAI Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर नोंदणी करून user id आणि पासवर्ड तयार करा.
  • हे सगळं झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य भरावी.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करणार असल्यास प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज करावा लागेल.

NHAI Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • श्री राजेश चौधरी, उपसचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, कक्ष क्रमांक २३९, वाहतूक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-११०००१

NHAI Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • रंगीत पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • नियुक्ती/पदोन्नती आदेश
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट
  • पालक विभागाद्वारे प्रमाणित ‘Verification Certificate’
  • गेल्या 5 वर्षांचे APARs/ACRs च्या प्रमाणित प्रती
  • प्रामाणिकपणा प्रमाणपत्र
  • दक्षता प्रमाणपत्र
  • दंडविरोधी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पगार व अनुभवाचे खात्रीशीर तपशील असलेले प्रमाणपत्र (पालक विभागाकडून)

NHAI Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसत्रही बोलावण्यात येईल.
  • पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड केली जाईल.
  • निवड झाल्यानंतर पद नाकारल्यास तो उमेदवार २ वर्षे कोणत्याही पदासाठी पात्र नसेल.

NHAI Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 11 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2025

NHAI Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटथे क्लिक करा

CSIR NIO Mumbai Bharti 2025, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २५,०००!!

NHAI Bharti 2025
NHAI Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment