NIOH Bharti 2024: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती सुरु झालेली आहे.ही भरती सहाय्यक, तंत्रज्ञ-1 आणि प्रयोगशाळा परिचर-1 या तीन पदांसाठी होत असून यासाठी एकूण २७ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. या भरतीची सगळी माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी. भरतीच्या जाहिरातीची PDF ची लिंक आणि अर्ज करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे .
NIOH Bharti 2024 भरतीचे नाव:
ICMR- National Institute of Occupational Health(NIOH) Recruitment 2024
NIOH Bharti 2024 पदाचे नाव:
- सहाय्यक(Assistant),
- तंत्रज्ञ-1(Technician-1),
- प्रयोगशाळा परिचर-1 (Laboratory Attendant-1)

NIOH Bharti 2024 एकूण रिक्त जागा:
27 रिक्त पदे
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक | 02 |
तंत्रज्ञ-1 | 19 |
प्रयोगशाळा परिचर-1 | 06 |
NIOH Bharti 2024 मासिक वेतन:
पदाचे नाव | मासिक वेतन |
सहाय्यक | ₹35,400 – ₹1,12,400 |
तंत्रज्ञ-1 | ₹19,900 – ₹63,200 |
प्रयोगशाळा परिचर-1 | ₹18,000 – ₹56,900 |
NIOH Bharti 2024 अर्ज पद्धती:
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
NIOH Bharti 2024 वयोमर्यादा:
- सहाय्यक – 30 वर्षे
- तंत्रज्ञ-1 – 28 वर्षे
- प्रयोगशाळा परिचर-1 – 25 वर्षे
NIOH Bharti 2024 अर्ज नोंदणी शुल्क
वर्ग | अर्ज शुल्क |
---|---|
सामान्य (UR)/OBC/EWS पुरुष उमेदवार | ₹1000/- (एक हजार रुपये) |
SC/ST, PwD, माजी सैनिक आणि महिला उमेदवार | ₹500/- (पाचशे रुपये) |
- एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
नवनवीन update साठी :: Click Here
ONGC HDP Bharti 2024 नोटिफिकेशन जाहीर, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आता तपासा
NIOH Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान तीन वर्षांची पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, संगणकाचे ज्ञान (MS office/ powerpoint)असणे गरजेचे आहे. |
तंत्रज्ञ-1 | 55% गुणांसह विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असावे तसेच, शासनमान्य संस्थेतून DMLT / Computer / Chemical Technology / Industrial Safety मधील किमान एक वर्षाचा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. |
प्रयोगशाळा परिचर-1 | शासनमान्य बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच, शासनमान्य किंवा नोंदणीकृत प्रयोगशाळेत एका वर्षाचा अनुभव किंवा संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र किंवा शासकीय संस्थेकडून दिलेले ट्रेड प्रमाणपत्र असणे गरजेचे. |
NIOH Bharti 2024 अर्ज कसा करावा:
उमेदवारांना सहाय्यक, तंत्रज्ञ-1 आणि प्रयोगशाळा परिचर-1 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://www.niohrecruitment.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे . इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही.
अर्ज सादर करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती ऑनलाईन जोडणे/अपलोड करणे आवश्यक आहे: –
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, उदा. 10वी पासूनची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र, तसेच संबंधित विषयातील डिप्लोमाचे प्रमाणपत्र किंवा संगणकाचे कार्यज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.
- कामाचा अनुभव दर्शवणारे प्रमाणपत्र.
- वयोमर्यादा सवलतीसाठी केंद्रीय सरकारच्या क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक स्वरूपातील अनुभव प्रमाणपत्र (Annexure-A).
- आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र, आवश्यक स्वरूपात (Annexure-B).
- प्रवर्गाचा पुरावा, उदा. SC/ST/OBC/PwD/ESM इत्यादी केंद्रीय सरकारच्या भरतीसाठी लागू.
- सरकारी कार्यालयात कार्यरत असल्यास, हरकत नाही प्रमाणपत्र .
- OBC उमेदवारांनी सादर करायचे निवेदन (Annexure-D).
- ICMR प्रकल्पांतर्गत सतत काम करणाऱ्या उमेदवारांसाठी ( तंत्रज्ञ-1 आणि प्रयोगशाळा परिचर-1 पदांसाठी) आवश्यक स्वरूपातील अनुभवाचा तपशील (Annexure-C).
- ICMR प्रकल्पांसाठी नियुक्ती पत्रे आणि रुजू होण्याचे आदेश ( तंत्रज्ञ-1 आणि प्रयोगशाळा परिचर-1 पदांसाठी).
- वयोमर्यादा सवलतीसाठी अपंगत्व प्रमाणपत्र (Annexure-G).
NIOH Bharti 2024 अंतिम दिनांक:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०२४ आहे
NIOH Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |