Pik Vima Yojana 2024-25 : नमस्कार शेतकरी मित्रांनो !! कसे आहेत. आज आपण पीक विमा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. काय आहे ही योजना, कोण असेल पात्र आणि कसा करायचा अर्ज ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात. शेती करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे शेतीचे नुकसान होत असते. जसे की पाऊस कमी पडणे, कधी कधी जास्त प्रमाणात पडणे, पिकाला कीड लागणे, पिकाला रोग लागणे अशा अनेक कारणांमुळे पिकाचे नुकसान होते व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. म्हणून भारत सरकारने शेतकरी बंधूंसाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरू केली आली आहे.
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1 रूपया भरून पीक विमा मिळू शकतो. त्यामुळे कठीण परिस्थिती ही शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल. हाच या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो.फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या शेतीचे क्षेत्रफळ, पिकांचे प्रकार, आणि लागवडीचे वर्ष याबाबदल माहिती असायला हवी.
योजना सुरु झाल्यापासून अनेक शेतकरी बंधूनी या योजनेचा फायदा घेतला आहे, पण अजूनही काही शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा कवच घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे अजून कोणी फॉर्म भरला नसेल तर त्याचा लाभ घ्या.
Pik Vima Yojana 2024-25 : योजनेचा उद्देश
- शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे काही नुकसान झाल्यास त्यांना विमा सरंक्षण मिळावे.
- शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने व चांगला पीक विमा सरंक्षण देणे.
- पिकाच्या नुकसानीसाठी तात्काळ आर्थिक मदत करणे.
Pik Vima Yojana 2024-25 : पात्रता
- प्रत्येक शेतकऱ्याला पिक विमा कवच घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
- फक्त योजनेत सहभागी होण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल त्याची पूर्तता करावी.
नवनवीन update साठी :: Click Here
Pik Vima Yojana 2024-25: आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- पिक पेरा घोषणापत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- चालू मोबाईल नंबर.

Pik Vima Yojana 2024-25 : पिक विमा कसा मिळवावा
- शेतकऱ्यांनी पीक विमा मिळवण्यासाठी त्यांच्या जवळच्या बँकेत किंवा कृषी विभागामध्ये जाऊन अधिकृत वेबसाईट वरून पीक विमाचा फॉर्म भरावा.
- हा विमा मिळवण्यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्याची माहिती आधार कार्ड, बँक डिटल्स व इतर आवश्यक माहिती द्यावी.
Pik Vima Yojana 2024-25 : पिक विमा फॉर्म स्टेटस (Status) कसे चेक करायचे?
- प्रधानमंत्री फसल बीमा योजना पोर्टलवर जाऊन स्टेट्स चेक करण्यासाठी लॉगिन करायच.
- लॉगिन केल्यानंतर “Farmer’s Corner” किंवा “पिक विमा स्टेटस” सेकशन वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती जसे कि, जिस्ट्रेशन नंबर, आधार कार्ड इत्यादी माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर पिक विमा फॉर्मचा स्टेटस दिसेल.
- शेतकरी इतर कोणत्याही पर्यायाने स्टेट्स चेक करू शकतात. जसे कि, स्थानिक कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट दिल्यावर ही माहिती मिळू शकेल.
Pik Vima Yojana 2024-25 : अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो.
ऑनलाईन अर्ज पद्धत
- प्रधानमंत्री फसल बीमा योजना या वेबसाईटवर जाऊन Farmer’s Corner क्लीक करायचे.
- तिथे वेगवेगळे खूप पर्याय असतात. त्यामध्ये New Farmer Registration करा.
- Register वर क्लीक केल्यावर आवश्यक ती संपूर्ण माहिती भर.
- Apply for Crop Insurance” किंवा “पिक विमा अर्ज करा” पर्याय निवडून तुमच्या पिकाबद्दल माहिती देऊ शकता.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जातो त्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणतात. तो जपून ठेवा तुम्हाला अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी लागेल.
ऑफलाईन अर्ज पद्धत
- जवळच्या बँकेत किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन फॉर्म घ्यावा
- सर्व आवश्यक माहिती तसेच पिकाची माहिती ही भरून घ्यावी.
- विमा प्रीमियम भरल्यानंतर तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रक्रिया केला जातो.
Pik Vima Yojana 2024-25: महत्त्वाचे मुद्दे
- पिक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुरक्षिततेची शाश्वती देतो.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीसाठी वेळेवर आणि योग्यप्रकारे विमा भरणे आवश्यक आहे.
Pik Vima Yojana 2024-25: महत्त्वाची तारीख
पिक विमा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |