REC Limited Bharti 2024: REC Recruitment 2024:: REC Limited कडून उपव्यवस्थापक, अधिकारी आणि इतर पदांच्या भरती जाहीर झाली आहे. एकूण 74 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे .
REC Limited ही महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे तसेच एक प्रतिष्ठित नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे, जिला ‘इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी’ दर्जा प्राप्त आहे. REC संपूर्ण भारतभर विस्तार आहे आणि ती वीज क्षेत्रातील (उत्पादन, प्रसारण, वितरण) सर्व विभागांना वित्तीय सहाय्य पुरवणारी मुख्य कंपनी आहे.
याशिवाय, पारंपरिक व्यवसायाबरोबरच आरईसी आता इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स क्षेत्रात पाऊल टाकत आहे. सर्व अशा नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी नक्की या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.
REC Limited Bharti 2024: इतर माहिती
एकूण जागा – 74
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
उपमहाव्यवस्थापक | 02 |
महाव्यवस्थापक | 03 |
मुख्य व्यवस्थापक | 04 |
व्यवस्थापक | 05 |
उपव्यवस्थापक | 15 |
सहायक व्यवस्थापक | 09 |
अधिकारी | 36 |
नवनवीन update साठी :: Click Here
REC Limited Bharti 2024: वयोमर्यादा
उपमहाव्यवस्थापक – 48 वर्षे
महाव्यवस्थापक – 52 वर्षे
मुख्य व्यवस्थापक – 45 वर्षे
व्यवस्थापक – 42 वर्षे
उपव्यवस्थापक – 39 वर्षे
सहायक व्यवस्थापक- 35 वर्षे
अधिकारी – 39 वर्षे
REC Limited Bharti 2024: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
उपमहाव्यवस्थापक | बी.ई/बी.टेक/एम.ई/एम.टेक (संबंधित शाखा) |
महाव्यवस्थापक | बी.ई/बी.टेक/एम.ई/एम.टेक/एमबीए/पीजी डिप्लोमा/पदवी (संबंधित क्षेत्र) |
मुख्य व्यवस्थापक | बी.ई/बी.टेक/एलएलबी/कोणतीही पदवी/एम.ई/एम.टेक (संबंधित क्षेत्र) |
व्यवस्थापक | बी.ई/बी.टेक/कोणतीही पदवी/एम.ई/एम.टेक (संबंधित क्षेत्र) |
उपव्यवस्थापक | सीए/सीएमए/बी.ई/बी.टेक/कोणतीही पदवी/एम.ई/एमसीए/एम.टेक/एमसीएस/एम.एससी/एमबीए/पीजी डिप्लोमा/पदवी (संबंधित क्षेत्र) |
सहायक व्यवस्थापक | सीए/सीएमए/बी.ई/बी.टेक/कोणतीही पदवी/एम.ई/एमसीए/एम.टेक/एमसीएस/एम.एससी (संबंधित क्षेत्र) |
अधिकारी | सीए/सीएमए/बी.ई/बी.टेक/कोणतीही पदवी/एम.ई/एमसीए/एम.टेक/एमसीएस/एम.एससी/एमबीए/पीजी डिप्लोमा/पदवी (संबंधित क्षेत्र) |

REC Limited Bharti 2024: वेतन
उपमहाव्यवस्थापक – रु,1,00,000 ते 2,60,000
महाव्यवस्थापक – रु.1,20,000 ते 2,80,000
मुख्य व्यवस्थापक – रु. 90,000 ते 2,40,000
व्यवस्थापक – रु. 80,000 ते 2,20,000
उपव्यवस्थापक – रु. 70,000 ते 2,00,000
सहायक व्यवस्थापक- रु. 60,000 ते 1,80,000
अधिकारी – रु.50,000 ते 1,60,000
REC Limited Bharti 2024: अनुभव
- सरकारी संस्था/सार्वजनिक उपक्रम/बँकांमधून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 1 वर्षाचा अनुभव असावा.
- खाजगी संस्थांमधील उमेदवारांनी संबंधित पदावर किमान 1 वर्ष कार्य केलेले असावे व नमूद केलेल्या CTC मानधनास पात्र असावे.
- प्रतिनियुक्तीवरील उमेदवारांसाठी मूळ विभागातील पद व वेतनश्रेणी विचारात घेतली जाईल.
- शैक्षणिक अनुभव, अभ्यास अवकाश किंवा विशेष रजा अनुभवात समाविष्ट केला जाणार नाही.
REC Limited Bharti 2024: अर्ज शुल्क
सर्वसामान्य उमेदवारांसाठी – रु. 1000/-
SC/ST/PwBD/माजी सैनिक/आतील उमेदवारांसाठी- शुल्क नाही
पेमेंट पद्धत – ऑनलाइन द्वारे
REC Limited Bharti 2024: निवड प्रक्रिया
- अपूर्ण अर्ज थेट नाकारले जातील.
- पात्रता निकष पूर्ण केल्याने मुलाखतीसाठी हक्क प्राप्त होणार नाही.
- अर्जांची तपासणी करून तांत्रिक ज्ञान व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे निवड केली जाईल.
- योग्य उमेदवारांना लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेला 85% व मुलाखतीस 15% गुण असणे गरजेचे आहे.
- जास्त अर्ज मिळाल्यास पात्रतेच्या निकषांपेक्षा उच्च निकष लावले जाऊ शकतात.
- लेखी परीक्षेसाठी TA/DA दिला जाणार नाही. परंतु, बाहेरून आलेल्या मुलाखत उमेदवारांना प्रवास भत्ता दिला जाईल.
- निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव व मुलाखतीतील मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल.
REC Limited Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे
- जन्मतारीख पुरावा.
- जात प्रमाणपत्र.
- अपंगत्व प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
- शैक्षणिक पात्रतेचे उत्तीर्ण प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
- अनुभव प्रमाणपत्र (पद, कालावधी, वेतनश्रेणी).
- वार्षिक CTC ची कागदपत्रे (Form 16, 12 महिन्यांची पगार पावती).
- वार्षिक उलाढालीचा पुरावा (खाजगी क्षेत्रातील उमेदवारांसाठी).
- अनुभव सिद्ध करणारी कार्यालयीन आदेश/प्रमाणपत्रे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- उमेदवाराची स्वाक्षरी.
REC Limited Bharti 2024: अर्ज प्रक्रिया
- REC अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- एकाच पदासाठी अर्ज करा, अन्यथा उच्च पदासाठी विचार केला जाईल.
- ईमेल आयडी व मोबाईल नंबरने नोंदणी करा.
- ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे (.jpg/.png/.pdf; 1 MB पेक्षा कमी) अपलोड करायची आहेत./
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
REC Limited Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – 11 डिसेंबर 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
REC Limited Bharti 2024: महत्त्वाच्या लिंक्स
Tadoba Tiger Reserve Bharti 2024, ताडोबा व्याघ्र प्रकल्प मध्ये विविध पदासाठी भरती