RITES Bharti 2025: RITES लिमिटेड अंतर्गत 25 जागांसाठी भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RITES Bharti 2025 ::RITES लिमिटेड अंतर्गत “सहाय्यक महामार्ग अभियंता, सर्वेक्षण अभियंता, सहाय्यक पूल अभियंता, परिमाण सर्वेक्षक, विद्युत अभियंता, सीएडी तज्ञ” पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही एकूण 25 जागा भरण्यासाठी होणार आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

वॉक-इन मुलाखत 13 जानेवारी 2025 ते 17 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे. या पदांसाठी अनुभवाची आवश्यकता आहे. सुरुवातीला नियुक्ती एक वर्षाच्या करारावर असेल. कंपनीच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण भारतात कुठेही जॉइनिंग करावी लागेल. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी. सर्व अटी पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी जरूर अर्ज करावा.



RITES Limited has announced recruitment for the positions of Assistant Highway Engineer, Survey Engineer, Assistant Bridge Engineer, Quantity Surveyor, Electrical Engineer, and CAD Expert. A total of 25 vacancies will be filled through this process, which involves walk-in interviews at the specified address.

The interviews will take place from 13th January 2025 to 17th January 2025. Candidates should note that the age limit for these positions is 40 years, and relevant experience is a must. Initially, the roles will be on a one-year contract, and selected candidates must be ready to join anywhere in India based on the company’s requirements.

This is an excellent opportunity for experienced professionals seeking a dynamic role. Make sure to read the official advertisement carefully before applying. If you meet the eligibility criteria, don’t miss this chance

RITES Bharti 2025: इतर माहिती

एकूण जागा – 25 जागा

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक महामार्ग अभियंता08
सर्वेक्षण अभियंता07
सहाय्यक पूल अभियंता04
परिमाण सर्वेक्षक02
विद्युत अभियंता02
सीएडी तज्ञ02

RITES Bharti 2025: वयोमर्यादा


40 वर्षे

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

RITES Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक महामार्ग अभियंतासिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
सर्वेक्षण अभियंतासिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
सहाय्यक पूल अभियंतासिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी
परिमाण सर्वेक्षकसिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी
विद्युत अभियंताइलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी
सीएडी तज्ज्ञसिव्हिल/कॉम्प्युटरमध्ये पदवी किंवा विज्ञान अभियांत्रिकीमध्ये पदवी

RITES Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतन
सहाय्यक महामार्ग अभियंता25,504 रु. दरमहा
सर्वेक्षण अभियंता24,040 रु. दरमहा
सहाय्यक पूल अभियंता25,504 रु. दरमहा
परिमाण सर्वेक्षक25,504 रु. दरमहा
विद्युत अभियंता26,269 रु. दरमहा
सीएडी तज्ञ22,660 रु. दरमहा
RITES Bharti 2025
RITES Bharti 2025

RITES Bharti 2025: अनुभव

आवश्यक आहे.


RITES Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

RITES Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक बघून आवश्यक अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करावी.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मिळालेला नोंदणी क्रमांक (Registration No.) नीट लक्षात ठेवावा.
  • अर्ज भरताना ओळखपत्राचे (Identity Proof) तपशील योग्य भरा. मुलाखतीवेळी मूळ ओळखपत्रे घेऊन यावे.
  • ऑनलाइन भरलेला अर्ज प्रिंट करून, स्वाक्षरीसह ठेवावा व मुलाखतीवेळी सादर करावा.
  • कागपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल .
  • फक्त एका पदासाठीच अर्ज करता येईल.
  • वॉक-इन मुलाखती 13जानेवारी 2025 ते 17जानेवारी .2025 या दिवसात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिल्या जातील.
  • वॉक-इन मुलाखतीसाठी दिलेल्या दोन्ही पत्त्यांपैकी एका ठिकाणी उमेदवारांनी पोहचावे.
RITES Bharti 2025
RITES Bharti 2025

RITES Bharti 2025: मुलाखतीचा पत्ता

  • RITES लिमिटेड, शिखर, प्लॉट 1, लेझर व्हॅली, राइट्स भवन, इफको चौक मेट्रो जवळ स्टेशन, सेक्टर 29, गुरुग्राम, 122001, हरियाणा
  • RITES Ltd., VAT-741/742,4th Floor,T-7, Sect-30A,इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई -400703

RITES Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • 10वी/हायस्कूल प्रमाणपत्र (जन्मतारखेचा पुरावा)
  • 12वीचे गुणपत्रक
  • डिप्लोमा/पदवीचे सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक
  • डिप्लोमा/पदवी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर शिक्षणाचे सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक
  • पदव्युत्तर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पीएचडी गुणपत्रके आणि प्रमाणपत्र (असल्यास)
  • मागील कंपनीचे रिलिव्हिंग लेटर/अनुभव प्रमाणपत्र,
  • शासकीय/पीएसयू कर्मचाऱ्यांची NOC
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो

RITES Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • मिळालेल्या अर्जाची पडताळणी केली जाईल. त्यातून काही उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट केली जातील.
  • उमेदवारांची नवे शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार कंपनीकडे असतील.
  • तांत्रिक व व्यावसायिक प्राविण्य – 65%
  • व्यक्तिमत्त्व, संवाद आणि कौशल्य – 35%
  • अशा प्रकारे मुलाखत 100% होईल.
  • ज्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये 60% गुण मिळाले असतील त्यांचीच गुणांकन यादी केली जाईल.
  • आरक्षित पदांसाठी SC/ST/OBC (NCL)/PWD साठी 50% गुण आवश्यक आहेत.
  • RITES नियम आणि वैद्यकीय फिटनेस मानकांनुसार वैद्यकीय तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती संबंधित पदासाठी केली जाईल
  • उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे, ज्याची मूळ कागदपत्रांद्वारे पडताळणी केली जाईल.
  • हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत उमेदवार मुलाखत देऊ शकतो.

RITES Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025

वॉक-इन मुलाखती – 13 जानेवारी 2025 ते 17 जानेवारी 2025

RITES Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातइथे क्लिक करा
🔗  ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटथे क्लिक करा

Dharampeth Polytechnic Nagpur Bharti 2024, धरमपेठ पॉलिटेक्निक नागपूर मध्ये लैक्चरर पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment