Sangli PTB Bharti 2025: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक (सांगली पीटीबी)मध्ये लिपिक पदासाठी भरती जाहीर! आजच Online अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Sangli PTB Bharti 2025: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक (सांगली पीटीबी) येथे लिपिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 20 जागांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT झालेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. परीक्षा सांगली जिल्ह्यामध्येच होणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. परीक्षेच्या आधी शैक्षणिक पात्रता व इतर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी केली जात नाहीये. पण मुलाखती नंतर सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाईल याची नोंद घ्यावी.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने दिलेल्या वेबसाइटवरून अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे. अर्ज करताना वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

The Sangli District Primary Teachers Cooperative Bank (Sangli PTB) has announced recruitment for the position of Clerk. A total of 20 vacancies are available. Candidates with a graduate degree in any stream and MSCIT certification are eligible to apply for this position.

Selection will be based on an online examination and an interview. The exam will be conducted in Sangli district only. No travel allowance will be provided to candidates appearing for the examination. Note that educational qualifications and other documents will not be verified before the examination, but all documents will be thoroughly checked after the interview.

Applications must be submitted online through the provided website. The last date to apply is 17th January 2025. Candidates must provide a valid mobile number and email ID during the application process. Eligible and interested candidates are advised to carefully read the official advertisement PDF before applying.

Sangli PTB Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – लिपिक
एकूण जागा – 20

Sangli PTB Bharti 2025
Sangli PTB Bharti 2025

Sangli PTB Bharti 2025: वयोमर्यादा


21 वर्षे ते 35 वर्षे
त्यापेक्षा जास्त नसावे.

Sangli PTB Recruitment 2025: शैक्षणिक पात्रता


कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
MSCIT आवश्यक


Sangli PTB Bharti 2025: अनुभव


आवश्यक नाही.
(असल्यास त्यासंबंधित माहिती सबमिट करावी)

Sangli PTB Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


सांगली

Sangli PTB Bharti 2025: अर्ज शुल्क


परीक्षा शुल्क – रु. 725 + (18%GST)
पेमेंट ऑनलाईन करायचे आहे. Net Banking, UPI, Credit Card, QR Code याच्या माध्यमातून पेमेंट करावे.

केलेले पेमेंट अपडेट होण्यासाठी 48 ते 72 तास लागू शकतात.

Sangli PTB Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज भरताना स्वतःची वैयक्तिक माहिती योग्य भरावी.
  • तसेच अर्जामध्ये चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून पुढील अपडेट्स मिळत राहतील.
  • अपूर्ण अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • आरक्षण, अनुभव, शैक्षणिक पात्रता संबंधित माहिती अचूक असावी.
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जही प्रत व शुल्क भरलेली प्रत निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यत सांभाळून ठेवावी.
  • रजिस्टर पूर्ण झाल्यावर User ID & Password असे पेजवर दिसेल.
  • तसेच अर्ज भरताना वापरलेल्या मोबाईल नंबर SMS पाठवला जाईल.तो पदभरती पूर्ण होईपर्यत नीट ठेवावा.
  • उमेदवाराचा फोटो आणि सही अपलोड करताना क्लिअर दिसेल याची काळजी घ्यावी.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Sangli PTB Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव संबंधित कागदपत्रे (अनुभव असल्यास)
  • रंगीत फोटो
  • उमेदवाराची सही

Sangli PTB Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • निवड ऑनलाईन परीक्षा व मुलाखत घेऊन केली जाणार आहे.
  • तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही लक्षात घेतली जाईल

Sangli PTB Bharti 2025: परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
  • 90 मिनिटांचा कालावधी असेल.
  • MCQ टाईप मध्ये ही परीक्षा असणार आहे.
  • परीक्षा 90 गुणांची असेल आणि मुलाखत 10 गुणांची असेल.
  • त्यात 5 गुण शैक्षणिक पात्रता आणि 5 गुण मुलाखतीला असतील.
  • परीक्षा सांगली जिल्ह्यातच असेल.

Sangli PTB Bharti 2025: महत्त्वाची माहिती

  • परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर होईल त्यामुळे उमेदवारांनी सजग राहावे.
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रवास भत्ता किंवा इतर कोणताही खर्च दिला जाणार नाही.
  • नोकरीसाठी कोणतीही शिफारस चालणार नाही. ठरल्याप्रमाणेच निवड प्रक्रिया होईल.
  • मुलाखतीवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे. तेव्हा पडताळणी केली जाईल.
  • परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल. पोस्टाने पाठवले जाणार नाही.

Sangli PTB Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज भरण्यास सुरुवात – 3 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2025
Sangli PTB Bharti 2025
Sangli PTB Bharti 2025

Sangli PTB Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरातइथे क्लिक करा
 Online अर्जइथे क्लिक करा
 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

All India Shri Shivaji Memorial Society Pune bharti 2025, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया.आजच करा अर्ज!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment