TIFR Mumbai Bharti 2025: TIFR मुंबई (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई) येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे इंजिनिअर (C), सायंटिफिक ऑफिसर (C), प्रशासकीय अधिकारी (C), सायंटिफिक असिस्टंट (B), कनिष्ठ अभियंता (B), तांत्रिक सहाय्यक (B), प्रशासकीय सहाय्यक (B), प्रयोगशाळा सहाय्यक (B), ट्रेड्समन (B), लिपिक (A), वर्क असिस्टंट – तांत्रिक या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील.
अतिरिक्त वय सवलतीसाठी पात्र उमेदवारांनी पोस्टाद्वारे अर्ज करावा. अर्ज पाठ्वण्याचा पत्ता प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
TIFR Mumbai Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 26
TIFR Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
इंजिनिअर (C) | अभियांत्रिकी पदवी 60% गुणांसह + अनुभव |
सायंटिफिक ऑफिसर (C) | इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व (टेली) कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी किंवा संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी 60% गुणांसह + अनुभव |
प्रशासकीय अधिकारी (C) | कायद्याची पदवी 60% गुणांसह, संगणकाचे ज्ञान + अनुभव |
सायंटिफिक असिस्टंट (B) | विज्ञान शाखेत पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन / संगणक अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स व संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञानातील पदवी 60% गुणांसह + अनुभव |
कनिष्ठ अभियंता (B) | इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील डिप्लोमा 60% गुणांसह, संगणकाचे ज्ञान + अनुभव |
तांत्रिक सहाय्यक (B) | इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेत पदवी 60% गुणांसह, संगणकाचे ज्ञान + अनुभव |
प्रशासकीय सहाय्यक (B) | कोणत्याही शाखेतील पदवी 55% गुणांसह, वर्ड प्रोसेसिंग / डेटाबेस / अकाउंटिंग प्रक्रियेत प्रवीणता + अनुभव |
प्रयोगशाळा सहाय्यक (B) | NTC किंवा NAC (NCVT मार्फत) 60% गुणांसह + अनुभव |
ट्रेड्समन (B) | NTC किंवा NAC (NCVT मार्फत) 60% गुणांसह + अनुभव |
लिपिक (A) | कोणत्याही शाखेतील पदवी 50% गुणांसह, टायपिंगचे ज्ञान + अनुभव |
वर्क असिस्टंट – तांत्रिक | 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा NTC (NCVT मार्फत) + अनुभव |
नवनवीन update साठी :: Click Here
TIFR Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा
पदाचे नाव | कमाल वयोमर्यादा |
---|---|
इंजिनिअर (C) [मेकॅनिकल] | 28 वर्षे |
इंजिनिअर (C) [सिव्हिल] | 33 वर्षे |
सायंटिफिक ऑफिसर (C) | 33 वर्षे |
सायंटिफिक ऑफिसर (C) | 28 वर्षे |
प्रशासकीय अधिकारी (C) | 40 वर्षे |
सायंटिफिक असिस्टंट (B) | 28 वर्षे |
कनिष्ठ अभियंता (B) | 28 वर्षे |
तांत्रिक सहाय्यक (B) [इलेक्ट्रिकल] | 28 वर्षे |
तांत्रिक सहाय्यक (B) [इलेक्ट्रिकल] | 33 वर्षे |
तांत्रिक सहाय्यक (B) [गार्डन] | 28 वर्षे |
प्रशासकीय सहाय्यक (B) | 33 वर्षे |
प्रयोगशाळा सहाय्यक (B) | 28 वर्षे |
ट्रेड्समन (B) [टर्नर] | 28 वर्षे |
ट्रेड्समन (B) [सिव्हिल] | 31 वर्षे |
ट्रेड्समन (B) [इलेक्ट्रिकल] | 28 वर्षे |
ट्रेड्समन (B) [फिटर] | 28 वर्षे |
ट्रेड्समन (B) [टर्नर] | 33 वर्षे |
ट्रेड्समन (B) [इलेक्ट्रिकल] | 33 वर्षे |
ट्रेड्समन (B) [इलेक्ट्रिकल] | 28 वर्षे |
लिपिक (A) | 28 वर्षे |
लिपिक (A) | 33 वर्षे |
वर्क असिस्टंट – तांत्रिक | 28 वर्षे |
TIFR Mumbai Bharti 2025: वेतन
- इंजिनिअर (C) – रु. 1,13,679/-
- सायंटिफिक ऑफिसर (C)- रु. 1,13,679/-
- प्रशासकीय अधिकारी (C)- रु. 1,13,679/-
- सायंटिफिक असिस्टंट (B)- रु. 70,290/-
- कनिष्ठ अभियंता (B)- रु. 70,290/-
- तांत्रिक सहाय्यक (B)- रु.70,290/-
- प्रशासकीय सहाय्यक (B)- रु. 70,290/-
- प्रयोगशाळा सहाय्यक (B)- रु. 45,219/-
- ट्रेड्समन (B)- रु.45,219/-
- लिपिक (A)- रु. 45,219/-
- वर्क असिस्टंट – तांत्रिक – रु.35,006/-
TIFR Mumbai Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
मुंबई
(आवश्यकतेनुसार उमेदवारांना इतर केंद्रांवर/फील्ड स्टेशनवर बदली होऊ शकते)
TIFR Mumbai Bharti 2025: अनुभव
पदानुसार अनुभव आवश्यक
TIFR Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील. अतिरिक्त वय सवलतीसाठी पात्र उमेदवारांनी पोस्टाद्वारे अर्ज करावा.
- अपूर्ण ऑनलाइन अर्ज व सवलतीसाठी पुरावे नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – शासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005.
TIFR Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट.
- ओळखपत्र (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स).
- जन्मतारीख/वयाचा पुरावा.
- शैक्षणिक पात्रता (सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्रे).
- CGPA/OGPA ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर विद्यापीठाच्या नियमांनुसार करणे आवश्यक.
- अनुभव प्रमाणपत्रे.
- SC/ST/OBC/EWS आणि PwBD प्रमाणपत्र (GOI प्रारूपात).
- OBC नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सध्याच्या आर्थिक वर्षासाठी आवश्यक.
- EWS प्रमाणपत्र सध्याच्या आर्थिक वर्षासाठी आवश्यक.
- PwBD उमेदवारांसाठी 40% किंवा अधिक अपंगत्व असलेले प्रमाणपत्र आवश्यक
TIFR Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया
- अर्ज करण्यापूर्वी पात्रता तपासा; अयोग्य अर्ज नाकारले जातील.
- आवश्यकतेनुसार लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी व मुलाखत होऊ शकते.
- संस्थेला कोणतेही पद न भरण्याचा अधिकार राखीव आहे.
TIFR Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 21 डिसेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2025.
TIFR Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 आँनलाईन अर्ज | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | ईथे क्लिक करा |