UIDAI Bharti 2024 :UIDAI Recruitment 2024:- युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI ने विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, सहाय्यक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer ) आणि सहाय्यक विभाग अधिकारी( Assistant Section Officer ) या दोन पदासाठी UIDAI ने भरती प्रक्रिया सुरूवात केली आहे. या मध्ये एकूण ०३ रिक्त पदे आहे, ही रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती जाहीर केलेली आहे.
UIDAI मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरी अंतिम तारखेच्या आत ऑफलाईन अर्ज करावे, या भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२५ आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज करावा, अर्ज करण्यापूर्वी भरतीची मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचून नंतरच अर्ज करावा, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती बदल ची जाहिरात खाली दिलेली आहे.