WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. ही भरती “सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान), सहाय्यक (अंमलबजावणी आणि कायदेशीर)” या दोन पदांसाठी होणार आहे. या पदाची भरती 3 वर्षाच्या काळासाठी होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कामगिरी बघून हा कालावधी वाढू ही शकतो. या पदांसाठी त्या क्षेत्रातील किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज उपसंचालक, वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016 या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.
WDRA Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान), सहाय्यक (कायदेशीर)
एकूण जागा – 02 जागा
सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान) | 1 जागा |
सहाय्यक ( कायदेशीर) | 1 जागा |
वयोमर्यादा | 56 वर्षे |
अनुभव | आवश्यक आहे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2025 |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | उपसंचालक, वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016 |

WDRA Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान)
- अंतर्गत IT प्रणालीचे व्यवस्थापन व स्वयंचलन करणे
- ऑनलाइन पोर्टलचे देखरेख व सुधारणा करणे
- तंत्रज्ञानासंदर्भात काही बिघाड असल्यास अधिकाऱ्यांना सल्ला देणे
- नवीन प्रणालींचे निरीक्षण व अंमलबजावणी करणे
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी दिलेली इतर कामे पार पाडणे
सहाय्यक (कायदेशीर)
- गोदामे, रिपॉझिटरी, तपासणी संस्था आणि बाजारातील इतर घटकांविरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यास मदत करणे.
- तसेच, WDRA संबंधित न्यायालयीन प्रकरणे आणि कायदेशीर बाबी हाताळणे.
WDRA Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान)- अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/कॉम्प्युटर अभियांत्रिकी/कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा Masters in Computer Application
- सहाय्यक – सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायद्याची पदवी
WDRA Bharti 2025: वयोमर्यादा
- 56 वर्षे (यापेक्षा जास्त नको)
नवनवीन update साठी :: Click Here
WDRA Bharti 2025: अनुभव
- या पदांसाठी आवश्यक आहे
- सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान)- किमान 3 वर्षांचा माहिती तंत्रज्ञान (IT) प्रणाली, IT ऍप्लिकेशन, सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर व संगणक नेटवर्किंग या संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
- सहाय्यक (कायदेशीर) – किमान 3 वर्षांचा कायदेशीर बाबतीतील Legal Matters कामाचा अनुभव असावा.
WDRA Bharti 2025: वेतन
- सहाय्यक (माहिती तंत्रज्ञान)- Level-7 दरमहा रु. 44,900 ते रु.1,42,400 (7th CPC)
- सहाय्यक- Level-7 दरमहा रु. 44,900 ते रु.1,42,400 (7th CPC)]
WDRA Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- त्यासाठी जाहिरातीच्या Pdf सोबत असणाऱ्या Annexure-II मध्ये आवश्यक वैयक्तिक माहिती भरून अर्ज करायचा आहे.
- अर्ज उपसंचालक, वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016. या पत्त्यावर पाठवायचा आहे.
- एकदा अर्ज सादर केल्यानंतर, उमेदवारांना नंतर त्यांचा अर्ज मागे घेता येणार नाही.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पोस्टाने पोहचावा अशा पद्धतीने अर्ज करावा.
WDRA Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- उपसंचालक, वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, एनसीयूआय बिल्डिंग, सिरी संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली-110016.
WDRA Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- अचूक भरलेला अर्ज (Annexure-II)
- मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल (CRs)
- सॅलरी स्लिप (सध्या काम करत असल्यास)
- सध्याच्या पदाचे आणि प्रतिनियुक्तीवरील पदासाठी पात्रतेचे प्रमाणपत्र
- कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित नाही किंवा प्रस्तावित नाही याचे प्रमाणपत्र
- प्रामाणिकता प्रमाणपत्र (Integrity Certificate)
- गेल्या 10 वर्षांत कोणतीही मोठी/लहान शिक्षा नाही याचे प्रमाणपत्र (Annexure-III)
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधारकार्ड / PAN कार्ड /मतदान कार्ड)
- Vigilance Clearance प्रमाणपत्र
WDRA Bharti 2025: निवड प्रक्रिया
- अर्ज आल्यानंतर सर्व अर्जाची तपासणी केली.
- त्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाते.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- या पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराचा कामाचा कालावधी 3 वर्षांचा असेल.
WDRA Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 06 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2025
WDRA Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
